Ricky Ponting On BCCI: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात (WTC Final) सलग दुसऱ्यांदा भारतानं एन्ट्री मिळवली आहे. यंदा भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं दगडं आव्हान असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना क्रिकेटची पंढरी म्हणून प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानात (Lords Stadium) खेळला जाणार आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा स्टार माजी खेळाडू आणि दिल्ली कॅपिटल्सचा कोच रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने मोठं वक्तव्य केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (WTC Final) फायनल होणार आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया (Austrelia) आणि भारताचे (India) संघ खेळतील. तेथील परिस्थितीबद्दल तुम्हाला काय सांगायचे आहे? असा सवाल विचारला गेला होता. त्यावेळी रिकीने बेधडक उत्तर दिलं.  टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलसाठी (WTC Final 2023) मी समालोचकाच्या भूमिकेत असेन, जे माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. अंतिम सामना कसोटीतील दोन सर्वोत्तम संघांमध्ये खेळवला जातो. त्यामुळे दोन्ही संघांना तडगी कामगिरी करावी लागेल, असं रिकी म्हणाला आहे.


काय म्हणाला Ricky Ponting?


उमेश यादव, बुमराह बुमराह आणि मोहम्मद शमी या खेळाडूंची आगामी वर्ल्ड कप आणि डब्ल्यूटीसी फायनलसाठी संघात निवड झाली असेल तर बीसीसीआयने खेळाडूंना विश्रांती देऊन आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी तयार केलं पाहिजे, असं मत रिकीने मांडलं आहे.


BCCI चं काय चुकलं?


अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आयपीएल लिलावात भाग घेतला नाही. मिचेल स्टार्क आणि स्टीव्ह स्मिथ यांनी आराम करण्याची तयारी दर्शविली. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी आम्हाला संतुलन राखावं लागेल, असं म्हणत रिकी पाँटिंगने बीसीसीआयला सुनावलं आहे. 


आणखी वाचा - IPL 2023: तीच एनर्जी, तोच अंदाज; Delhi Capitals ला मिळाला Rishabh Pant सारखा 'तोडफोड' खेळाडू!


दरम्यान, इंग्लंडमधील परिस्थिती ऑस्ट्रेलियासाठी अनुकूल असेल असं वाटतंय, पण गेल्या चार-पाच वर्षांत भारतीय संघाने परदेशात चांगली कामगिरी केल्याचं दिसून आलंय. दोन्ही संघांमधील अंतिम सामन्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे, असंही रिकी पाँटिंग म्हणाला आहे. दैनिक जागरणशी बोलताना रिकीने महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.