IPL 2023: तीच एनर्जी, तोच अंदाज; Delhi Capitals ला मिळाला Rishabh Pant सारखा 'तोडफोड' खेळाडू!

Rishabh Pant Replacement For IPL 2023: ऋषभच्या जागी आता दिल्लीने अभिषेक पोरेल (Abhishek Porel) याचा संघात समावेश केला जाणार आहे. पोरेलच्या स्वाक्षरीबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. 

Updated: Mar 29, 2023, 07:11 PM IST
IPL 2023: तीच एनर्जी, तोच अंदाज; Delhi Capitals ला मिळाला Rishabh Pant सारखा 'तोडफोड' खेळाडू! title=
Delhi Capitals Rishabh Pant

Abhishek Porel Replacement Rishabh Pant: दिल्लीचा (DC) स्टार प्लेयर ऋषभ पंत (Rishabh Pant) यंदाची आयपीएल (IPL 2023) खेळणार नसल्याने सर्वांचाच हिरमोड झाल्याचं पहायला मिळतंय. मात्र, आता दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) त्यावर उपाय शोधून काढला आहे. ऋषभच्या जागी आता दिल्लीने अभिषेक पोरेल (Abhishek Porel) याचा संघात समावेश केला जाणार आहे. त्यामुळे आता ऋषभच्या तोडीस तोड खेळाडू दिल्लीला मिळाल्याचं बोललं जात आहे. (Delhi Capitals set to sign Abhishek Porel as Rishabh Pant s replacement for ipl 2023 latest sports news)

David Warner चं टेन्शन संपलं!

येत्या 31 मार्चपासून आयपीएलच्या आगामी हंगामास (IPL 2023) सुरूवात होणार आहे. त्याआधीच आता दिल्लीने फक्त 20 वर्षाच्या अभिषेक पोरेलला संधी दिली जात असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या देखील आहेत. अभिषेक पोरेल (Abhishek Porel) हा प्रथमच आयपीएलचा भाग होणार आहे, त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल.

ऋषभ पंतच्या जागी बंगालचा विकेटकिपर फलंदाज अभिषेक पोरेलची संघात निवड केली जाईल. पोरेलच्या स्वाक्षरीबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. लवकर फ्रान्चायजी घोषणा करण्याची शक्यता आहे. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, शेल्डन जॅक्सन, लवनीथ सिसोदिया आणि विवेक सिंग यांना पोरेलसोबत मॅच सराव देण्यात सांगितलं होतं. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचं तिकीट पक्कं झाल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, दिल्लीचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आणि संघाचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली (Sourav Ganguly) गेल्या आठवड्यापासून अभिषेक पोरेलवर लक्ष्य ठेऊन होते. त्यानंतर त्याला संधी दिली जाईल, असं म्हटलं जात होतं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, त्याने 26 डावांमध्ये सहा फिफ्टी केल्या आहेत, त्यात 73 सर्वोत्तम आहेत. पोरेल टीममध्ये बॅकअप विकेटकीपर (Backup wicketkeeper) असण्याची शक्यता आहे.

दादा म्हणतो, Rishabh Pant ची उणीव भासणार

दरम्यान, आयपीएलच्या चालू हंगामात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाला त्यांच्या मुख्य यष्टीरक्षक फलंदाजाची म्हणजेच ऋषभ पंतची नक्कीच उणीव भासेल, असं सौरव गांगुली (Sourav Ganguly On Rishabh Pant) म्हणतो.