Rishabh Pant Accident: गेल्या वर्षी 30 डिसेंबर रोजी टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्या कारला अपघात (Car Accident) झाला होता. ऋषभ पंत याच्या कारचा नरसन शहराजवळील मोहम्मदपूर जट येथील महामार्गावरील कटानजीक येथे अपघात झाला होता. दुभाजकाला रिषभची कार धडकली होती. अशातच आता धक्कादायक व्हिडिओ (Video) समोर आला आहे. (Rishabh Pant accident happened a big accident happened again Google Trends Watch Video Roorkee Accident News)


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या ठिकाणी ऋषभ पंतचा अपघात (Rishabh Pant Accident) झाला होता, त्याचठिकाणी काल पुन्हा पुढे जात असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार उलटल्याची धक्कादायक घटना घडली. दुभाजकाला धडकून कार उलटल्याचं सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे. हरिद्वार जिल्ह्यातील (Haridwar District) रुरकी येथील नरसन भागात बुधवारी ही घटना घडली.


व्हायरल व्हिडिओमध्ये (Viral Video) दिसतंय की, एक काळ्या रंगाची कार समोरून फास्टमध्ये येत असते. त्यावेळी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला ओव्हटेक करण्याचा प्रयत्न कार करते. त्यावेळी एक बस जात असते, बसला देखील क्रॉस करण्याचा प्रयत्न कारचा असतो. मात्र, समोर दुभाजक असल्याने गाडीला स्पीड कंन्ट्रोल झाला नाही.


पाहा Video - 



दरम्यान, गाडी दुभाजकाला धडकते आणि कार कधी कोलांटी उडी घेते, कोणालाही कळलं नाही. त्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) कैद झाला आहे. त्यामुळे हा योगायोग म्हणावा की आणखी काही, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 


आणखी वाचा - Rishabh Pant ने Accident नंतर पहिल्यांदाच दिली मुलाखत! म्हणाला, "माझ्या आजूबाजूला..."


ऋषभच्या प्रकृतीत सुधारणा


अपघातानंतर स्वत: ब्रश करणंही फार समाधान देणारं वाटतं, असं ऋषभ एका मुलाखतीत (Rishabh Pant Interview) म्हणाला. सूर्यप्रकाशात उभं राहणंही मला फार आवडतं. मी क्रिकेट फार मीस करतो. मी आता माझ्या पायांवर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे, असंही तो म्हणाला होता.