मुंबई : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात कालच्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. शेवटच्या ओव्हरमध्ये अंपायरने नो बॉलचा करार दिल्यामुळे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत चांगलात वैतागला होता. यावेळी खेळाडूंना मैदानात परत बोलावल्यामुळे ऋषभ पंत सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता. यावेळी बॉलिवूड अभिनेता कमाल खानने पंतला सोशल मीडियावर डिवचंल ज्याचं प्रत्युत्तर म्हणून पंतने त्याला थेट ब्लॉक केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केआरकेने ऋषभ पंतवर निशाणा साधत म्हटलं होतं की, "सामन्यात ऋषभ पंतचा ड्रामा या गोष्टीचा पुरावा आहे की, तो त्याच्या जीवनात कधीही मोठा खेळाडू बनू शकत नाही. तो जीवनात मूर्खच राहणार आहे."


या ट्विटनंतर केआरकेने अजून एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्याने एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, ऋषभ पंतने संपूर्ण वेगाने मला ब्लॉक केलं आहे. ब्लॉक केल्याचा फोटोही यामध्ये पोस्ट करण्यात आला आहे.



मीडिया रिपोर्टनुसार, ऋषभ पंतने यापूर्वी अभिनेत्री उर्वशी रौतेलाला देखील सोशल मीडियावरून ब्लॉक केलं आहे. मात्र झी 24 तास या गोष्टीची खात्री करत नाही. 


नेमकं काय घडलं?


शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला विजयासाठी 36 रन्सची गरज होती. ओबेद मेकॉयला यावेळी 3 बॉलवर 3 सिक्स बसले. पण तिसरा बॉल नो बॉल असल्याचं पंत म्हणाला. मात्र अंपायरने तो नो बॉल दिला नाही. 


अंपायरच्या निर्णयावर चिडलेल्या पंतने आपल्या टीममधील खेळाडूंना क्रीझ सोडून बाहेर येण्यासाठी सांगितलं. कोचने मध्यस्ती केल्यानंतर पुढे मॅच सुरू झाली. अंपायर नो बॉल चेक करू शकला असता मात्र त्याने तसं केलं नाही.