Rishabh Pant Car Accident CCTV Footage : टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला. (Rishabh Pant Car Accident) रुरकीच्या नरसन सीमेवर हम्मादपूर गावाजवळ पंत यांची कार रेलिंगला धडकली. अपघातानंतर या कारने पेट घेतला. पंतला अपघातात गंभीर जखमी झाला असून दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, त्याच्या कारचा वेग प्रचंड होता. अपघात झाला तेव्हा कारचा वेग ताशी 200 किमी असा होता, त्यामुळे वाहनावर नियंत्रण मिळवता आले नाही, अशी माहिती समोर आली आहे. 


स्थानिक लोकांनीच ऋषभ पंतला कारमधून बाहेर काढले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऋषभ पंतच्या कारचा अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला. या घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी पंत याला कारमधून बाहेर काढले. त्यानंतर 108 क्रमांकावर फोन करुन माहिती दिली आणि त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, पंत याची कार भरधाव होती. त्याच्या कारचा वेग ताशी 200 किमी असल्याची माहिती समोर आली आहे. वेगवान कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला फेकली गेली. कारने तीन ते चार वेळा पटली मारल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, ऋषभने सीट बेल्ट लावला होता आणि एअर बॅग्जमुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला.


ऋषभ आधीच गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त


ऋषभ पंत आधीच गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त होता. या दुखापतीमुळे तो आगामी श्रीलंका मालिकेत सहभागी होऊ शकला नव्हता. त्याला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये खेळण्यास सांगण्यात आले होते. मात्र या घटनेने त्याचा तणाव आणखी वाढला आहे. त्याची दुखापत पाहता पुढील काही महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे.



बांग्लादेश दौऱ्यात ऋषभ पंतची चांगली कामगिरी


ऋषभ पंतने 2022 मध्ये टीम इंडियासाठी एकूण 7 सामने खेळले. यादरम्यान त्याने 61.81 च्या सरासरीने 680 धावा केल्या. कसोटीत तो सातत्याने चांगली कामगिरी करत आला आहे. अलीकडेच बांग्लादेश दौऱ्यावरही त्याने कसोटी मालिकेत मॅचविनिंग इनिंग खेळली होती. दुसरीकडे, ऋषभ पंतने यावर्षी भारतासाठी 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 37.33 च्या सरासरीने केवळ 336 धावा केल्या आहेत. T20 बद्दल बोलायचे झाले तर, या फॉरमॅटमध्ये त्याने यावर्षी 25 सामने खेळताना 21.41 च्या सरासरीने केवळ 364 धावा केल्या आहेत.