Rishabh Pant Viral Video: गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टीम इंडियाचा (Team India) विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) चा अपघात झाला. या अपघातामध्ये (Rishabh Pant Accident) पंत गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे अजून काही महिने पंतला क्रिकेटच्या मैदानापासून दूर रहावं लागणार आहे. आता आयपीएलचा 16 वा (IPL 2023) सिझन तोंडावर आहे आणि अशातच पंतचा कमबॅक करण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) ची सध्या रिकव्हरी (Rishabh Pant Recovery Video) सुरु आहे. अशातच पंतचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पंतने हा एक प्रमोशनल व्हिडीओ केला आहे. 


मी खेळायला येतोय- पंत


सोशल मीडियावर व्हायरल होत झालेल्या या व्हिडिओमध्ये पंत म्हणातोय, 'जर सगळे खेळत असतील तर मी का खेळू नये? बॉस मी अजूनही गेममध्ये आहे... मी खेळायला येतोय....'. मुख्य म्हणजे ही एका फूड डिलिव्हरी अॅपची जाहिरात आहे. मात्र यामधील पंतचं शेवटचं वाक्य चाहत्यांना खूप आवडलंय. 



या व्हिडीओमध्ये सुरुवातीला पंत म्हणतो, क्रिकेट आणि जेवण या दोन गोष्टींशिवाय मी जगू शकत नाही. गेल्या महिन्यांपासून मी क्रिकेट खेळू शकत नाहीये, मात्र डॉक्टरांनी मला नीट खाण्यास सांगितलंय. म्हणून मी घरी भरपूर आरोग्यासाठी योग्य असलेलं जेवणं जेवतोय."


ESPNcricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये ऋषभ पंतच्या जागी बंगालच्या अभिषेक पोरेलला संधी मिळण्याची शक्यता आहे. अभिषेक पोरेल (Abhishek Porel) हा प्रथमच आयपीएलचा भाग होणार आहे, त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 


दरम्यान अपघातानंतर पंत अजून पूर्णपणे फीट होऊ शकलेला नाही. मात्र असं असूनही पंतची मैदानात उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना दिल्लीचे हेड कोच रिकी पॉन्टीग (Ricky Ponting) म्हणाले, माझ्या आदर्श जगात ऋषभ पंत प्रत्येक मॅचमध्ये डगआउटमध्ये बसलेला असतो. हे शक्य नसेल तर आम्ही त्याला प्रत्येक पद्धतीने टीमचा भाग बनवणार आहोत. आम्ही त्याचा नंबर आमच्या जर्सी आणि कॅपवर लावण्याबाबत विचार करतोय."