Rohit Sharma : रितीकाचा निरोप घेताना रोहित शर्माने पाहा काय केलं? हिटमॅनचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Rohit Sharma and Ritika Sajdeh: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि रितीका ( Ritika Sajdeh ) यांची क्युट मोमेंट कॅप्चर झाली आहे.
Rohit Sharma and Ritika Sajdeh: येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात वनडे वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यंदाचा वर्ल्डकप ( World cup 2023 ) जिंकण्यासाठी टीम इंडिया ( Team India ) मोठी दावेदार मानली जातेय. वर्ल्डकपपूर्वी सध्या सुरु असलेली भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( Ind Vs Aus ) यांच्यातील सिरीज खूप महत्त्वाची मामली जातेय. या सिरीजमधील तिसरा वनडे सामना राजकोटवर खेळवण्यात येणार असून टीम इंडियाचा ( Team India ) नियमित कर्णधार रोहित शर्माचं ( Rohit Sharma ) या सामन्यात कमबॅक होणार आहे. दरम्यान राजकोटला पोहोचण्यापूर्वी रोहित ( Rohit Sharma ) आणि त्याची पत्नी रितीका ( Ritika Sajdeh ) यांची एक रोमॅन्टिक मोमेंट कॅमेरात कैद झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि रितीका ( Ritika Sajdeh ) यांची क्युट मोमेंट कॅप्चर झाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झाला दोघांचा व्हिडीओ
आशिया कप 2023 मध्ये भारताला चॅम्पियन बनवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला( Rohit Sharma ) ऑस्ट्रेलिया सिरीजमधील 2 सामन्यांमध्ये आराम देण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये तो टीमचा भाग नव्हता. यावेळी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत होता. रोहितने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. रोहित शर्मा एअरपोर्टवर येण्यापूर्वी रोहित आणि त्याच्या पत्नीचा एक खास क्षण आम्हाला पाहायला मिळाला.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा( Rohit Sharma ) गाडीतून उतरताना दिसतोय. यावेळी रोहित जाण्यापूर्वी रितीका ( Ritika Sajdeh ) त्याला गाडीत एक मिठी मारते. यानंतर रोहित शर्माच्या चेहऱ्यावर भरपूर आनंद दिसून येतोय. यानंतर रोहित शर्मा ( Rohit Sharma ) निघून जात असताना रितीका काहीशी नाराज असल्याचं ही व्हिडीओमध्ये दिसून येतंय.
ऑस्ट्रेलियाला क्लिन स्विप देणार का टीम इंडिया?
टीम इंडियाने केएल. राहुलच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2 सामने जिंकून सिरीज जिंकली आहे. मात्र आता तिसरा सामना जिंकून टीम इंडिया ( Team India ) क्लिन स्विप देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंशिवायही टीम इंडिया ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ टीमविरुद्ध चांगली खेळली. सिरीजतील दुसऱ्या सामन्यात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या शानदार शतकांच्या जोरावर भारताने 399 रन्स करत सामना जिंकला.