रोहित शर्माने रितिकाला `इथे` केलं होतं प्रपोझ
मुंबई : धर्मशाला वनडे सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने श्रीलंकेसमोर मोहालीत ३९३ रन्सचं टारगेट ठेवलं आहे.
मुंबई : मुंबई : धर्मशाला वनडे सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने श्रीलंकेसमोर मोहालीत ३९३ रन्सचं टारगेट ठेवलं आहे.
यात रोहित शर्माने नाबाद २०८ रन्स करत तिस-यांदा दुहेरी शतक करण्याचा रेकॉर्ड केलाय. पहिल्यांदा फलंदाजी करत टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये ४ विकेट गमावून ३९२ रन्स केलेत. आजच्या या सामन्यात रोहित शर्मा हिरो ठरला आहे.
त्याने २०० वी धाव घेताच प्रेक्षकांत बसलेली त्याची पत्नी रितिकाच्या डोळ्यात अश्रू तरळले. आज या दोघांच्या लग्नाचा वाढदिवस. रोहित शर्माने अॅनिवर्सरी गिफ्ट म्हणून केले नाबाद २०८ रन्स. त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या कपलची लव्ह स्टोरी
जेथे पहिल्यांदा झाली होती भेट, तेथेच केले प्रपोज
रोहित शर्माने आपली स्पोर्ट्स मॅनेजर राहिलेली रितिका सजदेहसोबत १३ डिसेंबर २०१५ रोजी लग्न केले होते. दोघांची भेट पहिल्यांदा २००९ मध्ये बोरिवलीतील स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती. रोहित शर्माने रितिकाला आपली स्पोर्ट्स मॅनेजर अपॉईंट केले होते. रितिका युवराज सिंगची राखी सिस्टर सुद्धा आहे. प्रोफेशनल रिलेशन्समुळे दोघांच्या गाठी-भेटी वाढू लागल्या. लवकरच ते दोघे फ्रेंड बनले आणि नंतर एकमेंकांचे बेस्ट फ्रेंड बनले.
६ वर्षाच्या फ्रेंडशिपनंतर रोहितने ३ जून २०१५ रोजी बोरिवलीतील स्पोर्ट्स क्लबमध्ये रितिकाला लग्नासाठी प्रपोज केले होते. ६ महिन्यानंतर दोघे विवाहबंधनात अडकले. रोहित आणि रितिकाचे लग्न मुंबईतील ताज लॅंड्स हॉटेलमध्ये झाले असून या लग्नात विराटने सोनाक्षीसोबत केलेला डान्स भरपूर चर्चेत होता.
लग्नात बॉलिवूडपासून ते बिजनेस वर्ल्डमधील मान्यवर व्यक्ती सहभागी झाले होते. वेडिंग सेरेमनी दरम्यान सोनाक्षी सिन्हा आणि विराट कोहलीचा डान्स सोशल मीडियात खूपच व्हायरल झाला होता.