VIDEO : धवन-रोहितने तोडला १० वर्ष जूना सेहवाग-गंभीरचा रेकॉर्ड
दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर टीम इंडियाने न्यूझीलंडला ५३ रन्सने मात दिली. टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटींग करत शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या दमदार अर्धशतकीय खेळीने २० ओव्हर्समध्ये २०२ रन्स केले होते.
नवी दिल्ली : दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर टीम इंडियाने न्यूझीलंडला ५३ रन्सने मात दिली. टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटींग करत शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्या दमदार अर्धशतकीय खेळीने २० ओव्हर्समध्ये २०२ रन्स केले होते.
पण न्यूझीलंड टीम केवळ १४९ रन्सच करू शकली. या सामन्यात धवन आणि शर्माने एक नवा रेकॉर्ड कायम केला आहे. भारताच्या या विजयाचे खरे मानकरी शिखर धवन आणि रोहित शर्मा हे दोघे ठरले. दोघांनी अशी फटकेबाजी केली की, न्यूझीलंड टीमच्या स्वप्नांवर पाणी फेरण्यात आलं. शिखर धवन आणि रोहित शर्माने ८०-८० रन्सची खेळी केली.
शिखरने ५२ बॉल्समध्ये ८० रन्स केले तर रोहित शर्माने ५५ बॉल्समध्ये ८० रन्स केलेत. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १५८ रन्सची भागीदारी केली. टीम इंडियाकडून टी-२० मध्ये हा एक नवा रेकॉर्ड आहे. याआधी हा रेकॉर्ड टीम इंडियाची सलामी जोडी विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्या नावावर होता.
या दोघांनी २००७ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विरूद्ध हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. त्यावेळी दोघांनी १३६ रन्सची भागीदारी केली होती. पण आता धवन आणि रोहितच्या जोडीने १५८ रन्स करून हा रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.
यासोबतच शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. दोघांनी एकाच सामन्यात सारखाच(८० रन्स)चा स्कोर केलाय. टी-२० क्रिकेटमध्ये दोन्ही सलामी बॅट्समननी एकसारखा स्कोर करण्याचा हा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. याआधी २०१० मध्ये पाकिस्तानकडून सलामी बॅट्समन कामरान अकमल आणि सलमान बट यांनी ७३-७३ रन्स केले होते.