वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने नुकतीच सीएट क्रिकेट अवॉर्ड्समध्ये हजेरी लावली होती. यावेळी रोहितची पत्नी रितिका सजदेह हे सुद्धा या कार्यक्रमाला आली होती. या कार्यक्रमादरम्यान रितिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रितिकाला पाहून फॅन्स ती गरोदर असल्याचे बोलत आहेत. त्यामुळे विराट कोहलीनंतर आता रोहित शर्मा सुद्धा दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माच्या जवळच्या व्यक्तीने रितिका गरोदर असल्याच्या बातमीला दुजोरा दिल्याचे एका मीडिया रिपोर्टमधून समोर आलेले आहे.  मात्र  zee 24 taas या बातमीची पुष्टी करत नाही. 13 डिसेंबर 2015 मध्ये रोहित शर्माने त्याची मॅनेजर रितिका सजदेह हिच्याशी लग्न केले होते. त्यानंतर 2018 मध्ये रोहित - रितिकाच्या घरी मुलीचा जन्म झाला जिचे नाव ' समायरा' असे ठेवण्यात आले. समायरा अनेकदा वडील रोहित शर्मा सोबत कार्यक्रम तसेच स्टेडियममध्ये सुद्धा दिसून येते. मात्र आता रोहित शर्मा पुन्हा एकदा बाबा होणार असल्याचे बोलले जात आहे.


हेही वाचा : 40 लाखात विकली गेली विराटची जर्सी, धोनी- रोहितच्या बॅटवरही लागली मोठी बोली, ऑक्शन दरम्यान पडला पैशांचा पाऊस


 


व्हिडीओमुळे सुरु झाल्या चर्च्या  : 


रोहित शर्मा आणि पत्नी रितिका सजदेह हे दोघे सीएट क्रिकेट अवॉर्ड्समध्ये गेले होते. यावेळी तेथील फोटोग्राफर्सनी काढलेल्या व्हिडीओमध्ये रितिकाचं पोट बाहेरच्या दिशेने वाढल्याचे दिसत असून यावरून अनेकांनी रितिका गरोदर असल्याचे म्हंटले आहे. मात्र अद्याप रोहित शर्मा किंवा स्वतः रितिकाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.



कशी आहे रोहित - रितिकाची लव्ह स्टोरी?


रोहित शर्माने एका मुलाखतीत सांगितल्या प्रमाणे रोहित आणि रितिकाची पहिली भेट ही २००८ रोजी एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. रितिका स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर म्हणून शूटमध्ये उपस्थित होती. रितिका ही युवराज सिंहची मानलेली बहीण आहे, तेव्हा युवराजने रोहितला रितिकापासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र इव्हेंट्स आणि क्रिकेट सामन्यादरम्यान रोहित आणि रितिकाची ओळख वाढत गेली. काही वर्षांनी रितिका ही रोहितची मॅनेजर म्हणून काम पाहू लागली.  यामुळे दोघांची जवळीक आणखीन वाढली आणि अनेक वर्ष डेट केल्यावर रोहित आणि रितिकाने २०१५ मध्ये लग्न केले.