IND vs AUS Final Clash : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनलचा सामना खेळवला जात आहे. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स याने घेतला होता. रोहित आणि शुभमन यांनी दमदार सुरूवात करून दिली. मात्र, शुभमन गिल प्रेशरमध्ये आला अन् त्याने आपली विकेट थ्रो केली. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जी चूक केली होती. तीच चूक शुभमन गिलने पुन्हा केली. एका गुड लेथ बॉलवर शुभमनने फ्लॉट शॉट मारला अन् बॉल थेट अँड़म झाम्पाच्या हातात गेला. शुभमनच्या विकेटनंतर रोहित शर्माने शुभमन गिलकडे रागात पाहिलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा याने शांत सुरुवातीनंतर आपल्या बॅटिंगचा दांडपट्टा सुरु करत फटकेबाजी केली. तर दुसऱ्या बाजूने शुबमन गिल रोहितला चांगली साथ देत होता. मात्र, शुभमन गिलच्या विकेटनंतर टीम इंडियाच्या धावगतीला ब्रेक लागल्याचं पहायला मिळालं. पहिल्या 7 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 61 धावा उभारल्या होत्या. त्यात रोहित शर्माचं योगदान महत्त्वाचं होतं.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


दोन्ही संघाची प्लेईंग ईलेव्हन 


ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.


टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.