मुंबई: एखादी गोष्ट विसरायची सवय तर प्रत्येकाजवळ असू शकते पण प्रत्येक गोष्ट विसरण्याची सवय आणि त्यानंतर होणाऱ्या गोष्टी निभावण्याचं कसब फार कमी लोकांमध्ये असतं. टीम इंडियातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिटमॅनला ही सवय आहे. तो भयंकर विसरळभोळा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना खूप गोष्टी विसरण्याची सवय आहे. रोहित शर्माने तर कहरच केला पासपोर्ट पासून ते वेडिंग रिंगपर्यंत अनेक गोष्टी तो विसरतो आणि त्याची ही सवय तो घालवण्याचा प्रयत्न करतो पण आजपर्यंत ते काही यशस्वी होऊ शकलं नाही. रोहित शर्मासोबत घडलेला असाज एक मजेशीर किस्सा त्याने एका मुलाखती दरम्यान सांगितला आहे. 


ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स दरम्यान दिलेल्या मुलाखतीमध्ये रोहित शर्माने आपल्या सवयीसंदर्भात सांगितलं आहे. कधी फोन तर कधी पासपोर्ट कधी घड्याळ देखील रोहित शर्मा विसरल्याचं सांगतो. जिथे जाईल तिथे एकतरी वस्तू विसरून येण्याची त्याची सवय आहे. किती गोष्टी कुठे विसरला याची यादी सांगणंही कठीण आहे. 


...म्हणून राहुल द्रविडने टीममधील सर्वांना फोन बंद ठेवण्याची दिली तंबी


आपल्या विसरण्याच्या सवयीबद्दल बोलताना रोहित म्हणाला की, 'तो एकदा लग्नाची अंगठीसुद्धा विसरला होता. नुकतच लग्न झालं होतं आणि ट्रेनिंग दरम्यान हाताला अंगठी लागते म्हणून ती काढून ठेवली होती. गोष्टी विसरून जाण्याची मला वाईट सवय आहे.' 


'मी साफ विसरून गेलो की अंगठी काढली आणि तिथेच राहिली आहे. त्यानंतर माझी रिंग टीममध्यल्या लोकांनी सुखरुप ठेवल्याचं कळलं पण त्यांनी तेवढीच माझी फिरकी देखील घेतली. एकदा मी तिच रिंग रात्री काढून झोपलो होतो तेव्हा हॉटेलवर विसरलो.' 


विराट कोहलीचे EX Girl Friend सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल


'हॉटेलमधून निघाल्यानंतर जेव्हा विमानतळावर पोहोचलो तेव्हा मला उमेश यादवच्या हातातली अंगठी पाहून मला रिंग आठवली. रिंगविषयी कोणाशी बोलू असा प्रश्न मला त्यावेळी पडला. मी ज्याला हे सांगितलं तो माझ्यावर हसत होता.' 


'शेवटी भज्जीपाजीची मदत घेऊन हॉटेलमध्ये राहिलेली रिंग परत मिळवली. माझ्या विसरभोळ्या स्वभावामुळे अनेकदा मी शरमिंदा होतो. बऱ्याचदा मी विसरणार नाही असा प्रयत्नही करतो पण ते होतं माझ्याकडून' असा मजेशीर किस्सा रोहित शर्माने शेअर केला आहे.