...म्हणून राहुल द्रविडने टीममधील सर्वांना फोन बंद ठेवण्याची दिली तंबी

राहुल द्रविडने अंडर 19 टीममधील खेळाडूंना का फोन बंद ठेवण्याची तंबी दिली? शुभमन गिलनं सांगितला किस्सा

Updated: May 21, 2021, 06:09 PM IST
...म्हणून राहुल द्रविडने टीममधील सर्वांना फोन बंद ठेवण्याची दिली तंबी title=

मुंबई: टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड आपल्या शांत स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. तो चिडलेला विशेष पाहायला मिळत नाही. मात्र त्याच्या चिडण्याचा आणि त्याने खेळाडूंना दिलेल्या तंबीची आठवण तर आजही सर्व खेळाडूंना चांगलीच लक्षात आहे. यासंदर्भात फलंदाज शुभमन गिल याने एक किस्सा सांगितला आहे. 

शुभमन गिल म्हणाला की, '2018मध्ये अंडर 19 संघाचा पाकिस्तान विरुद्ध सामना होता. त्या सामन्यापूर्वी IPLसाठी लिलाव सुरू होता. लिलाव होत असल्याचं मला रात्री उशिरा समजलं. माझ्यावर बोली लावण्यात आली होती. अभिषेक शर्मा, कमलेश नागरकोटी आणि मी आम्ही तिघं खूप खुश होतो. दुसऱ्या दिवशी कमलेशवर बोली लागणार होती.'

मी घरादार सोडून आलेय...' शांत, संयमी द्रविडला जेव्हा एका तरुणी फॅनने आणलं अडचणीत

'अंडर 19 टीमचा 30 जानेवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध सामना होता. 27 आणि 28 जानेवारीला IPLसाठी लिलाव सुरू होता. पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यासाठी तयारी सुरू होती. त्यासाठी कोच राहुल द्रविड यांनी  मिटिंग बोलवली. त्यांनी मोबाईल बाजूला ठेवायला सांगितलं. मात्र कोणाचंही त्याकडे लक्ष नव्हतं. प्रत्येकजण फोनमध्ये होता.'

'राहुल सरांनी त्यानंतर सर्वांना मोबाईल बंद करण्याची तंबी दिली. तरी शिवम मावीचा फोन वाजत होता. त्यांनी तो फोन बंद केला आणि त्याला बाजूला घेऊन वेगळं समजवलं होतं.'
 
IPLच्या लिलावानंतर शुभमन गिलनं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात आपलं शतक झळकावलं होतं. 94 चेंडूमध्ये त्याने 102 धावा केल्या. पृथ्वी शॉच्या नेतृत्वामध्ये अंडर 19 चॅम्पियन्स ट्रॉफी त्यावेळी टीम इंडियाकडे आली.