विराट कोहलीचे EX Girl Friend सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अनुष्काच्या आधी 'या' सुंदर मॉडेलला डेट करायचा विराट कोहली, सोशल मीडियावर फोटोनं घातला धुमाकूळ

Updated: May 23, 2021, 01:21 PM IST
विराट कोहलीचे EX Girl Friend सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला एक महिला क्रिकेट टीमच्या कर्णधाराने प्रपोज केल्याचा किस्सा सर्वांनाच माहिती आहे. त्यावेळी विराट कोहलीच्या आईनं हा प्रस्ताव फेटाळला होता. अनुष्कासोबत लग्नगाठ बांधण्याआधी विराट कोहली एका मॉडेलच्या प्रेमात होता. या दोघांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यानं चर्चेला उत आला आहे. 

ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री इजाबेल लिटे आपल्या सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. अभिनेत्री इजाबेल मात्र विराटच्या प्रेमात वेडी होती. विराट आणि अनुष्काचं लग्न होण्याआधी हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा देखील होती. इतकंच नाही तर इजाबेलनं एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता. 

इजाबेलने आपल्या अभिनयाला 2012मध्ये सुरुवात केली. आमिर खानच्या तलाश द आंसर लाइज विद इन या सिनेमातून पदार्पण केलं. 2012 ते 2014 दरम्यान विराट आणि इजाबेल दोघंही एकमेकांना डेट करत होते. 2013मध्ये एका मुलाखतीदरम्यान याबाबत मॉडेलनं खुलासा देखील केला. 

विराटसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीने यासंदर्भात एका मुलाखतीदरम्यान माहिती दिली होती. 'आम्ही दोघंही एकमेकांना डेट करत होतो. हे नातं दोघांच्या सहमतीनं आम्ही तोडलं आहे.' त्यांच्यात नेमका का दुरावा आला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

इजाबेल आणि विराट यांच्यातील नातं संपुष्टात आल्यानंतर विराट कोहलीच्या आयुष्यात अनुष्का शर्मा आली. या दोघांनी 11 डिसेंबर 2017मध्ये लग्न केलं आणि त्यांना आता एक गोंडस मुलगी आहे. वामिका असं विरानुष्काच्या मुलीचं नाव आहे.