IND vs SL : भारताने श्रीलंकेला (IND vS SL) वनडे सिरीजमध्ये क्लिन स्विप दिला. 3 सामन्यांच्या या वनडे सिरीजमध्ये टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेचा सुपडा साफ करत तिन्ही वनडे (IND vs SL 3rd ODI ) सामने जिंकले आहेत. तिसरा वनडे सामना जिंकत टीम इंडियाने मोठा इतिहास रचला. गिल, कोहली, शर्मा तसंच टीमच्या गोलंदाजांनी देखील चांगला खेळ केलाय. दरम्यान ट्रॉफी मिळाल्यानंतर टीम इंडियाचा एक खेळाडू भावूक झालेला दिसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सिरीजमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. 2023 वर्षात टीम इंडियाने ही दुसरी सिरीज जिंकली आहे. यानंतर रोहित अँड कंपनी फार खुश दिसत होते. तिसरा वनडे सामना जिंकल्यानंतर स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubhman Gill) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) एकमेकांना मिठी मारली. यावेळी रोहितने ट्रॉफी हाती आल्यानंतर ती गोलंदाज मोहम्मद सिराजच्या हाती सोपवली. यावेळी सिराज खूर भावूक झाल्याचं दिसून आलं. 


Team India च्या कर्णधाराने सोपवली ट्रॉफी


या सिरीजमध्ये सिराजने उत्तम कामगिरी केली. या सिरीजमध्ये तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने 4.05 च्या इकोनॉमीने 9 विकेट्स पटकावल्यात. यावेळी रोहितने ट्रॉफी सिराजच्या हातात दिली आणि तो भावूक झाला होता. ट्रॉफी दिल्यानंतर सर्व खेळाडू फोटोसाठी पोज देऊन उभे होते. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. 



टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय


भारताच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोहम्मद सिराजने श्रीलंकेच्या बॅटींग ऑर्डरला खिंडार पाडलं. सिराजने कुसल मेंडिस 4, अविष्का फर्नांडो 1, नुवानिदू फर्नांडो 19, आणि वानिंदू हसरंगा 1 यांना बाद केलं. नुवानिदू फर्नांडो वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. फर्नांडो, शनाका 11, कसून राजिथा नाबाद 13 हे खेळाडू दुसऱ्या एकाही फलंदाजाने दुहेरी धावसंख्या केली नाही. 


मोहम्मद सिराजने 5 विकेट पूर्ण करण्यासाठी 1 विकेट घ्यायला आपली पूर्ण ताकद पणाला लावली. मात्र त्याला यश आलं नाही. सिराजसह कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. श्रीलंकेला विराटला दिलेलं जीवदान महागात पडलं. विराट कोहलीने शतक केल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला, सिक्स आणि चौकार मारत संघाला 400 च्या जवळपास आणून ठेवलं.