IND vs AFG T20 Series: 2024 मध्ये टी-20 वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलंय. या वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया ( Team India ) अफगाणिस्तानविरूद्ध अखेरची टी-20 सिरीज खेळणार असल्याने ही सिरीज फार महत्त्वाची मानली जातेय. या सिरीजसाठी टीम इंडियाची ( Team India ) कमान रोहित शर्माच्या ( Rohit sharma ) हाती असणार आहे. त्यामुळे आगामी वर्ल्डकप पाहता रोहित शर्माला ( Rohit sharma ) टीम निवडण्यासाठी अनेक मोठे निर्णय घ्यावे लागणार आहे. जाणून घेऊया अफगाणिस्तानविरूद्धच्या सिरीजसाठी प्लेईंग 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी देईल. 


दोन खेळाडू, जागा मात्र एक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानविरुद्ध खेळली जाणारी टी-20 सिरीज ही वर्ल्डकपपूर्वी भारताची शेवटची टी-20 सिरीज असणार आहे. या सिरीजसाठी सिलेक्शन कमिटीने संजू सॅमसन ( Sanju Samson ) आणि जितेश शर्मा यांची विकेटकीपर म्हणून टीममध्ये निवड केलीये. यावेळी टीममध्ये कोणाला संधी द्यायची याबाबत रोहितला ( Rohit sharma ) मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. दोन्ही खेळाडूंना एकत्र टीममध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. 


संजूचा अनुभव जितेशवर पडणार भारी?


संजू सॅमसनने ( Sanju Samson ) टीम इंडियासाठी आतापर्यंत 24 टी-20 सामने खेळलेत. संजू सॅमसनने ( Sanju Samson ) 21 डावांमध्ये 133.57 च्या स्ट्राईक रेटने आणि 19.68 च्या सरासरीने 374 रन केले आहेत. याशिवाय 1 अर्धशतकी खेळी देखील खेळली आहे. दुसरीकडे जितेश शर्माने टीम इंडियासाठी आतापर्यंत फक्त 7 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 150.00 च्या स्ट्राईक रेटने 69 रन केले आहेत. 


दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 सिरीजमध्येही तो टीम इंडियाचा भाग होता. याशिवाय संजूने ( Sanju Samson ) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये शतक ठोकलं. दोघांचाही रेकॉर्ड पाहता दोन्ही खेळाडू टीममधील स्थानासाठी प्रबळ दावेदार मानले जातायत. 


भारत-अफगानिस्तान सिरीजचं शेड्यूल


पहिला सामना, 11 जानेवारी, मोहाली 
दुसरा सामना, 14 जानेवारी, इंदौर 
तीसरा सामना, 17 जानेवारी, बंगळूरू


अफगानिस्तानविरूद्धच्या सिरीजसाठी कशी आहे टीम इंडिया?


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, आवेश खान, मुकेश कुमार