IND vs SL 2nd ODI : वॉशिंग्टनचं काय चुकलं? LIVE सामन्यात सुंदरला मारायला धावला रोहित शर्मा, पाहा Video
India vs Sri lanka 2nd ODI : वॉशिंग्टन सुंदरने अशी काही चूक केली की, कॅप्टन रोहित शर्माला संताप अनावर झाला अन् तो सुंदरला मारायला धावला (Rohit Sharma ran to hit Washington Sundar). नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Rohit Sharma ran to hit Washington Sundar : श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि यजमान श्रीलंका यांच्यात दुसरा टी-ट्वेंटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या अन् टीम इंडियासमोर 241 धावांचं आव्हान ठेवलं आहे. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. सुंदरने 10 ओव्हरमध्ये फक्त 30 धावा दिल्या. पण सुंदरने सामन्यात अशी चूक केली की, रोहित शर्मा त्याला मारायला लाईव्ह सामन्यात धावून गेला. त्यामुळे सामन्यात मोठा गोंधळ झाल्याचं पहायला मिळालं. नेमकं प्रकरण काय होतं? रोहितला राग कशाचा आला? पाहा
नेमकं काय झालं?
कर्णधार रोहित शर्माची मजेशीर शैली पुन्हा एकदा समोर आली आहे. सामन्यादरम्यान, एका ओव्हरमध्ये दोनदा रनअप सुरू केल्याने सुंदरला चेंडू टाकता आला नाही. पहिल्या चेंडूनंतर स्लिपला उभ्या असलेल्या रोहितने काहीही रिअॅक्शन दिली नाही. मात्र, दुसऱ्या वेळी जेव्हा सुंदरने पुन्हा तिच चूक केली, तेव्हा रोहित भडकला अन् सुंदरच्या मस्करीत अंगावर धावला. असं वाटत होतं की तो सुंदरला मारणार आहे, पण काही पावलांनी परतला आणि रोहितला देखील हसू आवरलं नाही. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा Video
दरम्यान, श्रीलंकेकडून सलामीवीर अविष्का फर्नांडोने 40 धावांची महत्त्वाची खेळी केली तर कुशल मेंडिसने 30 धावा केल्या. तर अखेरच्या ओव्हरमध्ये दुनिथ वेललागे याने 39 धावा आणि कामिंदू मेंडिस यांनीही 40 धावा करत श्रीलंकेला 240 धावांवर पोहोचवलं. त्यामुळे श्रीलंकेला एक सन्मानजनक स्कोर उभा करता आला. तर टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने 3 विकेट्स तर कुलदीप यादवने 2 विकेट्स नावावर केल्या.
टीम इंडिया (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.