मुंबई : यंदाची आयपीएल मुंबई इंडियन्स आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नाही. 4 सामन्यानंतरही या टीमला एकंही विजय मिळवता आलेला नाही. यामुळे मुंबईच्या टीमला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतंय. एकीकडे टीमचा परफॉर्मन्स असा असताना कर्णधार रोहित शर्मासंदर्भात एक मोठं वक्तव्य व्हायरल झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचा 15वा सिझन सुरु होण्यापूर्वी विराट कोहली तसंच महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडून दिलं. याच मुद्द्यावरून संजय मांजरेकर यांनी रोहित शर्मावर निशाणा साधला आहे. 


संजय मांजरेकर यांच्या म्हणण्याप्रमाणे, सिझनच्या सुरुवातीला मला असं वाटलं की, रोहित शर्मा कर्णधारपद सोडून टीमची कमान किरण पोलार्डकडे सोपवेल. जसं विराटने केलं तर रोहितंही करेल.


ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना संजय मांजरेकर यांना पोलार्डच्या खराब परफॉर्मन्सबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी पोलार्ड टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण खेळाडू असल्याचं, मांजरेकर यांनी म्हटलं आहे.


संजय मांजरेकर म्हणाले, मला असं वाटतं की, पोलार्ड अजूनही मुंबईच्या टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे. यंदाचा सिझन सुरू होण्यापूर्वी मला वाटलं होतं की, रोहित शर्मा विराट कोहलीप्रमाणे कर्णधारपद सोडेल आणि केवळ फलंदाज म्हणून खेळेल. रोहित आंतरराष्ट्रीय स्तरावर महान कर्णधार असलेल्या किरॉन पोलार्डला कर्णधारपद देईल, अशी माझी आशा होती.


आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खूपच खराब झाली आहे. मुंबई इंडियन्स या सिझनचे 4 सामने खेळली आहे, परंतु यामध्ये एकदाही मुंबईला आपल्या नावे विजय नोंदवता आलेला नाही. ज्यामुळे आयपीएल 2022 मध्ये मुंबई टीमला सलग चार सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागलंय.