T20 World Cup: टी-20 वर्ल्डकपला आता अवघ्या महिन्याभराचा कालावधी उरलेला आहे. येत्या 2 जूनपासून आयसीसी टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणाही करण्यात आली. सध्या आयपीएल 2024 सुरु असून शुक्रवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. दरम्यान या सामन्यात रोहित शर्माने एक कठोर निर्णय घेतल्याचं दिसून आलं. हा निर्णय आगामी वर्ल्डकपच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असल्याचं म्हटलं जातंय. मात्र आता रोहित नंतर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह देखील हा निर्णय घेणार का हे पहावं लागणार आहे. 


आयपीएलमध्ये रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL 2024 च्या 51 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. हा सामना कोलकाता नाईट रायडर्ससाठी खूप महत्त्वाचा होता. या सामन्यापूर्वी मुंबईच्या टीमची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता फारच कमी होती. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माने असा निर्णय घेतला, ज्यामुळे टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला फायदा होण्याची शक्यता आहे.


आयपीएलमध्ये रोहित शर्माने घेतली रिस्क


कोलकाताविरूद्धच्या सामन्यात मुंबईच्या टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी टीमचा माजी कर्णधार आणि स्टार ओपनर रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं. अचानक रोहितला टीममधून वगळल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र विशेष बाब म्हणजे रोहित हा सामन्याबाहेर नव्हता तर केवळ प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर होता. रोहितचा इम्पॅक्ट प्लेयर्सच्या यादीत समावेश करण्यात आला होता. जेणेकरून तो फलंदाजी करताना मैदानात उतरू शकेल. 


काय असू शकतं यामागील नेमकं कारण?


फिल्डींगला न उतरता केवळ फलंदाजीला रोहित शर्मा का उतरला अशा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. याचं कारण टी-20 वर्ल्डकप आहे. दुसरीकडे पाहिलं तर मुंबई इंडियन्सच्या टीमचा प्रवास संपुष्टात आल्यात जमा आहे. कारण आयपीएलमधील मुंबईचा प्रवास आधीच संपला होता. अशावेळी रोहित फिटनेसबाबत जोखीम घेऊ शकत नव्हता. क्रिकेटमध्ये फिल्डींग करताना दुखापत होण्याची शक्यता असते. कदाचित याचाच विचार करून रोहितने टी-20 वर्ल्डकपसाठी हे टाळण्याचा निर्णय घेतला. 


रोहली आणि बुमराही घेणार हा कठोर निर्णय?


आता टी-20 वर्ल्डकपसाठी निवडलेले इतर खेळाडू, ज्यांचे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकत नाहीत, ते देखील असा निर्णय घेणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये सर्वात मोठं नाव विराट कोहलीचे आहे, कारण त्याची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. विराट कोहलीही रोहितप्रमाणे सामन्यात असा ब्रेक घेणार का? केवळ कोहलीच नाही तर हा प्रश्न जसप्रीत बुमराह आणि खुद्द मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या यांच्याबद्दलही हा प्रश्न उपस्थित होतोय.