Indian Test Team captain : वनडे वर्ल्ड कपमधील झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) कॅप्टन्सी राहिल की नाही? असा सवाल विचारला जात होता. मात्र, साऊथ अफ्रिका दौऱ्यातील टेस्ट सामन्यांसाठी (IND vs SA) रोहित शर्मावर पुन्हा विश्वास दाखवला. रोहितने देखील पुन्हा नव्या दमाने संघाची जबाबदारी सांभाळली. मात्र, पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांच्या खराब फलंदाजीमुळे निराशा पदरी पडली. या सामन्यात रोहित शर्माचा आत्मविश्वास देखील कमी झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्याचबरोबर त्याची फलंदाजी देखील खास राहिली नाही. त्यामुळे अनेकांनी रोहितला सावरण्याचा सल्ला दिलाय. मात्र, दुसरीकडे रोहितवर टीका देखील होताना दिसत आहे. अशातच टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथ (S Badrinath) याने विराटचं कौतूक करत रोहितवर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

S Badrinath म्हणतो...


विराट कोहली (Virat Kohli) महान खेळाडू असूनही टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व का करत नाही? असा सवाल भारतीय माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथ याने उपस्थित केला आहे. विराट कोहलीने 52 पेक्षा जास्त सरासरीने कसोटी कर्णधार म्हणून 5000 हून अधिक धावा करणाऱ्या 68 कसोटी सामन्यांमध्ये 40 विजय मिळवून दिला आहे. भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका विजय देण्याचं काम देखील विराट कोहलीने केलं आहे, असं म्हणत एस बद्रिनाथने किंग कोहलीचं (S Badrinath On Virat Kohli) कौतूक केलंय.


विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार का नाही? तो रोहितपेक्षा चांगला कसोटी फलंदाज आहे. त्याच्याऐवजी कमकुवत खेळाडू का नेतृत्व करतो? रोहित शर्मा मोठा खेळाडू आहे आणि त्याने सर्वत्र धावा केल्या आहेत. पण भारताबाहेर सलामीवीर म्हणून त्याने स्वत:ला सिद्ध केलेले नाही. मग तो तिथं का आहे?, असं म्हणत बद्रिनाथने रोहित शर्मावर (S Badrinath On Rohit Sharma) सडकून टीका केली आहे. एका YouTube चॅनेलवर बोलताना त्याने हे वक्तव्य केलं आहे.


दुसऱ्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन


दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन) : डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नंद्रे बर्गर.


भारत (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, आवेश खान, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.