कोण आहे सुशीला मीणा? जिच्या बॉलिंग स्टाईलचा फॅन बनला क्रिकेटचा देव, Video शेअर करून केलं कौतुक
सध्या सोशल मीडियावर सुशीलाच्या बॉलिंगचा व्हिडीओ व्हायरल होत असून सचिन तेंडुलकरने देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) 12 वर्षांची मुलगी सुशीलाच्या गोलंदाजीचा फॅन झालेला आहे. सचिनने राजस्थानच्या प्रतापगढ जिल्ह्यातील रामेर तलाब या गावात राहणाऱ्या सुशीला मीणा हिची बॉलिंग ऍक्शन ही भारताचा माजी गोलंदाज झहीर खान प्रमाणे असल्याचं म्हटलं आहे. सध्या सोशल मीडियावर सुशीलाच्या बॉलिंगचा व्हिडीओ व्हायरल होत असून सचिनने देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला. तसेच ही पोस्ट भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याला टॅग करत लिहिले की, " सोपे, सहज आणि सुंदर! सुशीला मीनाच्या बॉलिंग ॲक्शनमध्ये तुझी झलक दिसते झहीर. तुलापण हे दिसलं का? मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार सुशीला मीना ही अत्यंत गरीब कुटुंबातून येते. सुशीलाचे पालक हे शेतीचीकाम करतात आणि त्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सुशीलाच्या वडिलांचं नाव हे रतनलाल मीणा असून आईचं नाव शांतीबाई मीणा आहे.
हेही वाचा : 'रात्र-रात्रभर हॉटेलच्या बाहेर राहायचा...' क्रिकेटर पृथ्वी शॉबाबत MCA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा
पाहा व्हिडीओ:
सुशीला मीना ही शालेयस्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेत असते. सुशीलाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी विविध कमेंट्स करत असून काहीजण तिला 'लेडी झहीर खान' म्हणत आहे. तर काहीजण तिला भविष्यातील स्टार खेळाडू म्हणत आहेत. सुशीला बॉलिंगच्या या स्लो मोशन व्हिडिओमध्ये ती रनअप घेत झहीरप्रमाणेच बॉल टाकताना दिसतेय. भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानने 92 टेस्ट सामन्यांमध्ये 311 विकेट्स घेतल्या आहेत. तर झहीरच्या नावावर 200 वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 282 विकेट्स आहेत. झहीरने 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. झहीर खानने आतापर्यंत सचिनच्या या ट्विटला उत्तर दिलेलं नाही.