मुंबई : जगभरात क्रिकेटमधील देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सचिन तेंडुलकरबाबात ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनरनं धक्कादायक विधान केलं आहे. त्याच्या दृष्टीनं सचिन हा सर्वात बेस्ट कसोटीतील फलंदाज नाही हे देखील त्याने सांगितलं आहे. त्याच्या या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाणं आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर शेन वॉर्ननं खळबळजनक विधान केलं. माझ्या दृष्टीनं शतकांचं शतक ठोकणारा म्हणजेच 100 शतक ठोकणारा सचिन हा सर्वात बेस्ट खेळाडू नाही असं विधान त्याने केलं. यासोबत त्याने कसोटीमधील 5 बेस्ट क्रिकेटपटू कोण आहेत याची देखील नावं सांगितली आहेत. यामध्ये एका भारतीय खेळाडूचं देखील नाव आहे. 


क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकरने एकामागे एक शतक ठोकले. त्याच्या कामगिरीचं कौतुक जगभरात आजही होत असताना शेन वॉर्न मात्र त्या मताशी सहमत नाहीत. सचिन तेंडुलकरला बेस्ट फलंदाज मानत नाही. 


सचिन तेंडुलकर हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं ठोकली आहेत. सचिनने 200 हून अधिक कसोटी सामने खेळले. कसोटीत 51 शतके आणि 15,921 पेक्षा जास्त धावा केल्या. शेन वॉर्नच्या नजरेत या विक्रमांनाचं कवडीमोलही महत्त्व नसल्याचं त्याच्या बोलण्यातून दिसून आलं. 


शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये उल्लेख केलेल्या 5 बेस्ट फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकरलाही स्थान दिलं नाही. शेन वॉर्नने सध्याच्या काळातील टॉप-5 कसोटी क्रिकेटपटूंची नावं सांगितली. यामध्ये शेन वॉर्नने रोहित शर्माला स्थान दिलेले नाही. यामध्ये त्याने विराट कोहलीला स्थान दिलं आहे. 


शेन वॉर्नच्या दृष्टीनं कोण आहेत 5 बेस्ट फलंदाज
1. स्टीव स्मिथ
2. जो रूट
3. केन विलियमसन
4. विराट कोहली
5. मार्नश लाबुशेन