Sachin Tendulkar Wrong Endorsement Case: टीम इंडियाचा महान क्रिकेटर, क्रिकेटचा देव अशी ओळख असलेल्या सचिन तेंडूलकरविषयी (Sachin Tendulkar) एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सचिनच्या परवानगीशिवाय त्याचं नाव वापरल जातंय. फोटो आणि आवाजाचा वापर करून वैद्यकीय वस्तूंचा पब्लिसिटी केली जात असल्याचं समोर आलंय. sachinhealth.in या बनावट वेबसाइटची माहिती मिळाल्यानंतर सचिनच्या सहकाऱ्याने सायबर पोलिसांकडे (Cyber Police) तक्रार दाखल केली. या प्रकरणासंबंधी एक पत्र सचिनने इन्टाग्रामवर (Sachin Tendulkar Instagram) शेअर केलंय.


नेमकं काय लिहिलंय पत्रात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डिजिटल तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांना डेव्हलप आणि सशक्त बनवतं म्हणून, लोकांना प्रामाणिक उत्पादनं, सेवा आणि माहितीचा प्रवेश मिळावा यासाठी एक समाज म्हणून आपण एकत्र काम करणं आवश्यक आहे. सचिन तेंडुलकरशी संबंधित नसलेली उत्पादने आणि सेवा विकण्यासाठी अनधिकृत रीतीने त्यांच्या गुणधर्मांची तोतयागिरी करण्याचा प्रयत्न केला गेला जातोय, असं या पत्रात म्हटलं आहे.


अनधिकृत उत्पादनं आणि सेवा ऑनलाइन खरेदी करण्यासाठी भोळ्या नागरिकांची दिशाभूल करण्याच्या हेतूनं आणि दुर्भावनापूर्ण हेतूनं हे केलं जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारित केल्या जात आहेत. आम्ही सायबर सेल विभागाकडे अधिकृत तक्रार नोंदवली असल्याची माहिती या पत्राद्वारे देण्यात आली आहे.


आणखी वाचा - Virat Kohli On Sachin Tendulkar: '...तेव्हा मला लाज वाटते', सचिनचं नाव घेत विराट स्पष्टच बोलला!


तुम्हाला दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आढळल्यास, कृपया त्याची तक्रार करा, अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. उत्पादने आणि सेवांची ऑनलाइन खरेदी करताना आम्ही नागरिकांना म्हणून सतर्क राहण्याची गरज आहे, असंही यामध्ये म्हटलं आहे. भारतीय दंडसंहिता कलम 420 (फसवणूक), 465 (बनावट) आणि 500 (बदनामी) अंतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.



दरम्यान, गेल्या काही वर्षात सायबर गुन्हेगारींचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे आता पोलिसांनी देखील आरोपींच्या मुसक्या आवळत असल्याचं दिसून येतंय. सचिनच्या प्रकरणात पोलिस अधिक माहिती घेत आहे.