Virat Kohli On Sachin Tendulkar: '...तेव्हा मला लाज वाटते', सचिनचं नाव घेत विराट स्पष्टच बोलला!

Virat Kohli Sachin Tendulkar comparison: मी प्रत्येकवेळी ही गोष्ट मस्करीत घेतो. या लोकांना खेळाची काहीच कल्पना नसते. माझी तुलना सचिनशी (Sachin Tendulkar) केली जाते तेव्हा मला लाज वाटते, असं विराट (Virat Kohli) म्हणाला आहे.

Updated: Apr 18, 2023, 09:16 PM IST
Virat Kohli On Sachin Tendulkar: '...तेव्हा मला लाज वाटते', सचिनचं नाव घेत विराट स्पष्टच बोलला! title=
Virat Kohli Sachin Tendulkar

Virat Kohli On Sachin Tendulkar: सचिन तेंडूलकर म्हणजे क्रिकेटचा देव, असं म्हटलं जातं. एखाद्या खेळात देवाची उपाधी मिळणं म्हणजे सर्वोकृष्ट. सचिनच्या (Sachin Tendulkar) निवृत्तीनंतर विराट कोहलीने (Virat Kohli) सचिनची जागा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सचिनने दिग्गज रेकॉर्ड विराटने मोडण्यास सुरूवात केली. त्यामुळे हळूहळू विराटचं नाव चर्चेत आलं. कोहलीचा गेम सुधारला तसं, विराट आणि सचिनची तुलना होऊ लागली. सचिननंतर कोण? तर तो विराट, असं एक समीकरण तयार झालं होतं. मात्र, विराटला सचिनशी तुलना केलेली कधीच आवडत नाही. त्यावर आता विराटने (Virat Kohli On Sachin Tendulkar) मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला Virat Kohli ?

मी प्रत्येकवेळी ही गोष्ट मस्करीत घेतो. या लोकांना खेळाची काहीच कल्पना नसते.माझी तुलना सचिनशी केली जाते तेव्हा मला लाज वाटते, असं विराट म्हणाला आहे. माझ्या आणि सचिनच्या आकड्यांवरून ही तुलना लोकं करत असतात. पण हे आकडे तुम्हाला वेगळीच कथा सांगतात. लहानपणी एखाद्या खेळाडूने तुमच्यावर टाकलेली छाप खूप वेगळी असते, असं विराट (Virat Kohli) म्हणाला आहे.

सचिन (Sachin Tendulkar) आणि व्हिव्ह रिचर्ड्स (Viv Richards) या दोन्ही खेळाडूंशी कोणाचीही तुलना करू नये, कारण त्यांनी त्यांच्या काळात क्रिकेटमध्ये क्रांती केली होती आणि लोकांचा त्यांच्यावर विश्वास होता, असा विश्वास एखाद्या खेळाडूमध्ये क्वचितच आढळतो, असं म्हणत विराटने (Virat Kohli) अनेकांचं मन जिंकलं आहे.

आणखी वाचा - फॅफ डू प्लेसिस चा फिटनेस पाहून पोरी लाजल्या, पण अंगावर कोरलेल्या 'त्या' टॅटूचा अर्थ काय?

दरम्यान, सचिन तेंडुलकर माझ्यासाठी नेहमीच भावनिक राहिला आहे. तो प्रेरणा आणि दिलासा देणारा स्त्रोत आहे. आज आयपीएलमध्ये (IPL 2023) बरेच मॅच विनर्स आहेत, खेळ जिंकणारे प्लेयर्स कुठंही नाहीत. जसं रिंकू सिंगने पाच चेंडूत पाच षटकार मारले. ही माणसे करत असलेल्या गोष्टी करण्याचा मी विचारही करू शकत नाही. पण सचिन आणि व्हिव्ह रिचर्ड्स अशी कामगिरी कोणी करत नसताना करत होते, म्हणूनच त्यांना आज आयकॉन मानलं जातं, असंही विराट म्हणाला आहे.