मुंबई : काही दिवसांपूर्वीच सुरु झालेल्या IPL 2020 आयपीएल अर्थात इंडियन प्रिमीयर लीग या क्रिकेट स्पर्धेला दर दिवसागणिक आणखी रंग चढत आहे. खेळाडूंचा अफलातून खेळ आणि तितक्याच रंजक अंदाजात पार पडणारे हे सामने खऱ्या अर्थानं क्रीडा रसिकांसाठी परवणी ठरत आहेत. चर्चांच्या वर्तुळात असणाऱ्या याच IPL 2020 शी संबंधित आणखी एक विषय अनेकांचं लक्ष आहे. कारण याचा थेट संबंध आहे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासोबत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई विरुद्ध कोलकाता या संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्याचा एक व्हिडिओ सचिनची मुलगी सारा हिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. इन्स्टा स्टोरीमध्ये तिनं हा व्हिडिओ शेअर करत त्यावर हार्ट शेप इमोजी जोडल्याचं म्हटलं गेलं. हा स्क्रीनशॉटही भलताच व्हायरल झाला. तिनं पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये शुभमन गिल क्षेत्ररक्षण करताना दिसत होता. सारानं ही पोस्ट शेअर केल्याचं म्हणत सोशल मीडियावर तिच्या आणि शुभमनच्या नावाच्या चर्चांनी जोर धरला. 



साराची ही एकच पोस्ट चर्चेस वाव देत आहे, असं नाही. यापूर्वीही सोशल मीडियावर या दोघांनी अनेकांचं लक्ष वेधलं होतं. निमित्तं होतं एका पोस्ट वरील कॅप्शन. सारा आणि शुभमन या दोघांनीही एकसारखंच कॅप्शन ठेवल्यामुळं नेटकऱ्यांना त्यांच्या नात्याबाबत अनेक प्रश्न पडले. 




शिवाय शुभमनच्या पोस्टवर सारानं कमेंट करण, त्यावर शुभमननं उत्तर देणं हे सारंकाही बऱ्याच चर्चांना वाव देणारं ठरल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर दर दिवशी अनेक विषय चर्चेत येतात, पण त्यातही सचिनच्या मुलीचं नाव एका क्रिकेटपटूशी जोडलं जाणं याबाबत नेटकऱ्यांमध्ये भलतंच कुतूहल पाहायला मिळत आहे हे नाकारता येणार ऩाही. अर्थात सध्या मात्र याकडे अफवा म्हणूनच पाहिलं जात आहे.