शोएब मलिकने थाटला नवा संसार, सानिया मिर्झावर दु:खाचा डोंगर, 2 दिवसाआधीची पोस्ट चर्चेत!
Shoaib Malik Sana Javed Marriage : सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक यांचा 14 वर्षांचा संसार मोडीस निघाला आहे. अशातच सानिया मिर्झावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचं पहायला मिळतंय.
Shoaib Malik Sana Javed wedding: गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिक (Shoaib Malik) आणि भारतीय टेनिसस्टार सानिया मिर्झा (Sana Javed) यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. अशातच शोएब मलिकच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शोएब मलिक याने स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली. पाकिस्तानची अभिनेत्री सना जावेद (Sana Javed) हिच्यासोबत लग्नगाठ बांधली अन् नव्या संसाराला सुरूवात केली आहे. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे रोमँटिक फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा 14 वर्षांचा संसार मोडीस निघाला आहे. अशातच सानिया मिर्झावर दु:खाचा डोंगर कोसळल्याचं पहायला मिळतंय. दोन दिवसापूर्वी सानियाने केलेल्या एका पोस्टमध्ये तिचं दु:ख दिसून आलं होतं. घटस्फोट घेणं कठीण आहे, असं म्हणत सानियाने पोस्ट केली होती. त्यामुळे सानिया आणि शोएब यांचं बिनसलंय का? असा सवाल विचारला जात होता.
काय लिहिलं होतं पोस्टमध्ये?
लग्न कठीण आहे अन् घटस्फोट घेणं कठीण आहे.
लठ्ठपणा कठीण आहे पण तंदुरुस्त राहणं कठीण आहे.
कर्जात असणं कठीण आहे अन् आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध असणं कठीण आहे.
संवाद कठीण आहे पण संवाद साधणं कठीण आहे.
जीवन कधीही सोपं होणार नाही. हे नेहमीच कठीण असेल. पण तुम्ही आपली कठोर बाजू हुशारीने निवडा, असं सानिया मिर्झाने पोस्टमध्ये म्हटलं होतं.
गेल्या वर्षी 2023 मध्ये अनेकदा सानिया आणि शोएब यांच्यात नात्यातील कटुता समोर आली होती. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या हृदयाची शांती भंग करते, तेव्हा ते जाऊ द्या, असं म्हणत सानियाने पोस्ट केली होती. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा विवाह 2010 मध्ये झाला होता. या लग्नाने बरीच चर्चा झाली होती. सानिया मिर्झाने भारतीय टेनिसपटू स्वत:ला म्हणू नये आणि भारताच्या तिरंग्याखाली खेळू नये, असं म्हणत तिच्यावर टीका करण्यात आली होती.
कोण आहे सना जावेद?
सना जावेदचा जन्म 25 मार्च 1993 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे पाकिस्तानी कुटुंबात झाला होता. शाळा आणि महाविद्यालय पूर्ण केल्यानंतर, ती तिच्या कुटुंबासह कराचीला आली आणि नंतर कराची विद्यापीठातूनतिने पदवी प्राप्त केली. 2020 मध्ये तिने गायक उमेर जसवालशी लग्न केलं होतं. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर आता सनाने दोन लग्नातून निवृत्ती घेतलेल्या शोएब मलिकशी लग्नगाठ बांधली आहे.