Sanju Samson Viral Video: युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल आणि वीरेंद्र सेहवाग यांच्या बॅटिंगमधील अनुभव घेयचा असेल, तर गुरूवारी राजस्थान आणि कोलकाता (KKR vs RR) यांच्यात झालेला सामना पहायलाच हवा. शिट्ट्या, टाळ्या आणि ईडन गार्डनच्या मैदानात एक नाव गर्जत होतं, ते म्हणजे यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याचं. सामन्याच्या अखेरीस विजय की पराभव याचा विचार होतच नव्हता. चर्चा होती ती यशस्वी जयस्वाल शतक (Yashasvi Jaiswal Century) पूर्ण करणार की संजू सॅमसन फिफ्टी... सामन्याच्या अखेरीस राजस्थानच्या कॅप्टनने असं काही केलं की सर्वांना धोनी आणि विराटची आठवण आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चहलच्या (Yuzi Chahal) फिरकीपुढे कोलकाताच्या फलंदाजांनी नांगी टाकली. 20 ओव्हरमध्ये कोलकाताने 149 धावांचं आव्हान दिलं होतं. आता सामना राजस्थानसाठी अवघड जाईल, असं पिच कंडिशनवरून वाटत होतं. मात्र, जयस्वालच्या अस्त्रासमोर सर्वकाही फेल ठरलं. बटलर बाद झाल्यावर यशस्वीने सुपरफास्ट पकडली आणि फक्त 13 बॉलमध्ये 50 धावा पूर्ण केल्या. आयपीएल हंगामातील त्याची ही फास्टेस्ट हाफ सेंच्यूरी होती. त्यावेळी कॅप्टन संजू (Sanju Samson) मैदानात पाय रोवून उभा होता.


फास्टर असो वा फिरकीपटू... यशस्वीची आतिषबाजी सुरूच होती. 208 च्या स्टाईक रेटने जयस्वालने 47 बॉलमध्ये 98 धावांची खेळी केली. यामध्ये 13 फोर आणि 5 सिक्सचा समावेश आहे. 14 व्या ओव्हरमध्येच जयस्वालने सामना संपवला. 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर असं काही घडलं, ज्यामुळे सर्वांना धोनी आणि विराटची आठवण आली. सामना जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज होती. त्यावेळी संजू 48 वर खेळत होता. तर यशस्वी 94 वर नाबाद होता. संजू या बॉलवर 2 धावा घेऊन फिफ्टी करू शकला असता. मात्र, त्याने तसं केलं नाही.


आणखी वाचा - Team India: कोण होणार भारताचा नवा उपकर्णधार? रोहितनंतर 'या' 3 खेळाडूंच्या हाती संघाचं भविष्य!


सामन्याच्या 13 व्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर फटका न मारता त्याने यशस्वीच्या शतकासाठी तीन धावा वाचवून ठेवल्या. त्यानंतर 14 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर जयस्वालने बॉल उचचला पण तो गेला फोर... त्यामुळे त्याचं शतक हुकलं. 




दरम्यान, 2014 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये एमएस धोनीने (MS Dhoni) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटच्या चेंडूवर धाव घेतली नाही. त्यामुळे विनिंग खेळी करणाऱ्या विराटने (Virat Kohli) फोर मारत चाहत्यांची मने जिंकली होती. धोनीने विराटसाठी जसं विनिंग शॉट खेळण्याचं टाळलं, त्याचप्रकारने संजूनेही यशस्वीच्या शतकासाठी त्याच्या हाफ सेंच्युरीची कुर्बानी दिली. त्यामुळे चाहते त्याच्या या कृतीवर खुश असल्याचं दिसून आलंय.