Team India: कोण होणार भारताचा नवा उपकर्णधार? रोहितनंतर 'या' 3 खेळाडूंच्या हाती संघाचं भविष्य!

WTC Final 2023 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार (Team India Vice Captain) कोण असेल? असा सवाल विचारला जात असताना रोहितनंतर (Rohit Sharma) कॅप्टन्सीसाठी तीन खेळाडूंची नावं समोर येत आहेत.

May 11, 2023, 15:40 PM IST

WTC Final 2023: आयपीएल संपल्यानंतर जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना (WTC Final) खेळवला जाणार आहे. इंग्लंडच्या ओव्हर मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) 7 ते 14 डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळवली जाणार असल्याने सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता चर्चा सुरू झालीये ती टीम इंडियाच्या उपकर्णधाराची. WTC Final 2023 मध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार (Team India Vice Captain) कोण असेल? असा सवाल विचारला जात असताना रोहितनंतर (Rohit Sharma) कॅप्टन्सीसाठी तीन खेळाडूंची नावं समोर येत आहेत.

1/5

शुभमन गिल

टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुबमन गिलला भारताचा पुढील कसोटी उपकर्णधार बनवलं जाऊ शकतं .केएल राहुलच्या जागी शुभमन गिल रोहित शर्मासोबत फायनलमध्ये सलामीवीराची भूमिका निभावणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे संघाचं उपकर्णधारपद दिलं जाऊ शकतं.

2/5

ऋषभ पंत

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत हा भारताचा पुढील कसोटी उपकर्णधार होण्याचा प्रबळ दावेदार आहे. टीम इंडियाचा बॅकबोन म्हणून त्याची ओळख निर्माण झालीये. सध्या तो जखमी आहे. मात्र, ज्यावेळी तो पुन्हा मैदानात येईल, तेव्हा त्याच्याकडे जबाबदारी दिली जाऊ शकते.

3/5

श्रेयस अय्यर

टीम इंडियाचा मिडल ऑर्डरमधील फलंदाज श्रेयस अय्यर हा भारताचा पुढील कसोटी उपकर्णधार होण्याचा मार्गावर आहे. सध्या तो जखमी असल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप खेळणार नाही. मात्र, त्यानंतर टीम इंडियामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यावेळी श्रेयस अय्यर याचं नाव हमखास घेतलं जाईल.

4/5

ICC WTC Final साठी ऑस्ट्रेलियाचा संघ

पॅट कमिन्स (C), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.

5/5

ICC WTC Final साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (C), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, केएस भरत (WC), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.