IPL 2023 : चिदंबरम स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद (CSK vs SRH) यांच्यामध्ये सामना रंगलाय. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. अशामध्येच BCCI ने मोठी घोषणा केली आहे. यामध्ये बीसीसीआयने प्लेऑफचे सर्व सामने कुठे रंगणार आहे, याची माहिती दिलीये. 


कुठे खेळवले जाणार प्लेऑफचे सामने


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL 2023 Playoffs चे सामने कुठे खेळवले जातील, याबबात बीसीसीआने माहिती दिली नव्हती. याबाबतची घोषणा शुक्रवारी बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. त्यानुसार चेन्नई आणि अहमदाबादमध्ये 23 मे ते 28 मे 2023 दरम्यान क्वालिफायर 2 आणि फायनल हे सामने खेळवले जाणार आहेत. तर क्वालिफायर वन 23 मे रोजी चिदंबरम स्टेडियमवर होईल आणि त्यानंतर 24 मे रोजी एलिमिनेटर होणार असल्याची माहिती आहे.


दुसरीकडे ग्रुप स्टेजमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या असलेल्या टीम्समध्ये एलिमिनेटर सामना होतो. क्वालिफायर-2 सामना हा क्वालिफायर-1 मधील पराभूत टीम आणि एलिमिनेटरचा विजेता यांच्यात रंगणार आहे. त्यानंतर क्वालिफायर-1 आणि 2 च्या विजेत्यांमध्ये फायनल सामना होईल. त्यामुळे आता फायनलचं तिकीट कोणाला मिळणार हे पाहावं लागणार आहे.


कसं असेल आयपीएल 2023 प्लेऑफ सामन्यांचं टाईमटेबल


  • 23 मे कॉलिफायर 1, चेन्नई

  • 24 मे एलिमिनेटर, चेन्नई

  • 26 मे क्वॉलिफायर-2, अहमदाबाद

  • 28 मे अंतिम, अहमदाबाद