मुंबई :  भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, महेंद्रसिंह धोनी  MS Dhoni आता पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएल IPL सामन्यांमधून धोनी एका नव्या रुपात आणि अर्थातच नव्या उत्साहात क्रीडारसिकांच्या भेटीला येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BCCI बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून खेळाडूंचे नवे करार समोर आणले गेले तेव्हा त्यातून धोनीचं नाव वगळण्यात आलं होतं. त्यांचवेळी भारताच्या क्रिकेट संघातून धोनीही होणारी हळूवार एक्झिट क्रिकेट वर्तुळात अनेक प्रश्न आणि चर्चांना तोंड फोडून गेली. इतकंच नव्हे, तर धोनीच्या निवृत्तीविषयीसुद्धा कैक प्रश्न उपस्थि केले गेले. 


निवड समितीकडून वगळलं जाणं धोनीच्या कारकिर्दीचा उतार तर नाही असं वाटत असतानाच आता क्रिकेट संघात माहिचं पुनरागमन होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. आयपीएलच्या यंदाच्या पर्वात चेन्नईच्या संघाकडून खेळणाऱ्या धोनीच्या एकंदर खेळीवर फक्त क्रीडारसिकच नाही, तर निवड समितीचंही लक्ष असणार आहे. 



पाहा : 'येसूबाईं'ना नाही आवरला लाठीकाठी खेळण्याचा मोह; व्हिडिओ व्हायरल


आयपीएलच्या हंगामात धोनीचा खेळ नेमका कसा असणार यावरच त्याचं भविष्य ठरणार आहे. त्यामुळे कारकिर्दीच्या भवितव्यासाठी ठेवण्यात आलेली ही अट आता माही पूर्ण करतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुख्य म्हणजे आयपीएलमध्ये फक्त धोनीच नव्हे. तर, संघातील इतरही काही खेळाडूंनी आयपीएलमध्ये चांगलं प्रदर्शन केल्यास निवड समितीकडून संघातील स्थानासाठी त्यांच्याही नावाचा विचार केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेत संघात स्थान मिळवण्यास संघाचा माजी कर्णधार यशस्वी होणार का, याकडे साऱ्या क्रीडा जगताचं लक्ष आहे.