India vs England, Shafali Verma: टीम इंडियाच्या (INDW vs ENGW) मुलींनी रविवारी मोठा इतिहास रचला आहे. अंडर -19 टी-20 वर्ल्डकपमच्या फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करत टीम इंडिया विश्वविजेती (Team India win under 19 T20 womens World Cup) बनली. कॅप्टन शेफाली वर्माच्या (Shafali Verma) नेतृत्वाखालील भारतीय अंडर-19 महिला क्रिकेट संघाने अंतिम फेरीत इंग्लंडचा धुव्वा उडवला. मात्र, विजयाचा आनंदोत्सव साजरा करताना शेफालीला अश्रू अनावर झाले. (Shafali Verma Crying After Winning ICC Women's U-19 T20 World Cup Title 2023)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या महिला क्रिकेट संघातील लेडी सेहवाग (Lady Sehwag) म्हणून ओळखली जाणारी शेफाली वर्माने (Shafali Verma) अंडर-19 महिला वर्ल्ड कपमध्ये (U-19 World Women Cup) आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलंय. चॅम्पियन बनल्यानंतर भारतीय संघाची कर्णधार शेफाली वर्मा (U-19 Women Captain) खूप भावूक झाली. प्रेझेंटेशनच्या कार्यक्रमात शेफाली वर्मा काही वेळ रडत होती.


आणखी वाचा - कोण आहे Shafali Verma? जिने अवघ्या वयाच्या 19 व्या वर्षी भारताला बनवलं विश्वविजेता


शेफालीचा व्हिडिओ (Shafali Verma Crying Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेझेंटेशनवेळी तिला प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी तिला अश्रू अनावर झाले. मुळची हरियाणाच्या रोहतकच्या असणाऱ्या शेफालीने 15 व्या वर्षी टीम इंडियासाठी डेब्यू केला होता.  अवघ्या 15 व्या वर्षी या मुलीला टीम इंडियामध्ये जागा कशी मिळाली याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं.


पाहा Video - 



दरम्यान, आम्ही वर्ल्ड कप जिंकण्यासाठी येथे आहोत. तसेच, सर्व खेळाडू मला खूप साथ देत आहेत. मला हा सुंदर संघ दिल्याबद्दल बीसीसीआयचे (BCCI) आभार आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आम्ही खूप आनंदी आहोत. मुली एकमेकांना सपोर्ट करत आहेत त्यामुळे मी खूप आनंदी असल्याचं देखील शेफालीने (Shafali Verma) म्हटलं आहे.