Shafali Verma: भारताच्या अंडर-19 महिला टीमने (India Women Under-19) रविवारी मोठा इतिहास रचला. आयसीसीकडून (ICC) पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेला अंडर-19 महिला टी-20 वर्ल्डकप (India beat England by 7 wickets) भारताने जिंकला आहे. टीम इंडियाच्या महिलांना (Team India women) इंग्लंडच्या टीमला नमवत वर्ल्डकपवर पहिल्यांदाच नाव कोरलं आहे. भारताच्या मुलींच्या या टीमची धुरा सांभाळली ती अवघ्या 19 वर्षांच्या शेफाली वर्माने (Shafali Verma). शेफाली हे नाव सर्व भारतीयांसाठी ओळखीचं आहे. याच मुलीने वयाच्या 15 व्या वर्षी भारतासाठी डेब्यू केला होता आणि आता ती विश्वविजेती कर्णधार बनली आहे.
19 वर्षांच्या शेफालीने स्वतः इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यासाठी भरपूर मेहनत घेतली होती. यामध्ये तिचा फार संघर्षही आहे. शेफालीने एका इंटरव्ह्यूमध्ये स्वतः सांगितलं होतं की, कशा पद्धतीने ते वेगवान गोलंदाजीची प्रॅक्टिस करते. यासाठी ती मुलांना गोलंदाजी करायची, जेणेकरून ती वेगाचा सामना करू शकेल.
मुळची हरियाणाच्या रोहतकच्या असणाऱ्या शेफालीने 15 व्या वर्षी टीम इंडियासाठी डेब्यू केला होता. 2019 मध्ये, जेव्हा टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपसाठी तयारी करत होती, तेव्हा शेफालीने टीममध्ये एन्ट्री केली. अवघ्या 15 व्या वर्षी या मुलीला टीम इंडियामध्ये जागा कशी मिळाली याने सर्वांनाच आश्चर्य वाटलं होतं.
सुरुवातीच्या सामन्यामध्ये शेफाली वर्मा फलंदाजी करत होती. तिच्या फलंदाजीने जवळपास प्रत्येक क्रिकेटप्रेमी हैराण होता. शेफाली अगदी पहिल्या बॉलपासून गोलंदाजावर अटॅक करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर शेफालीने टी-20 वर्ल्डकपमध्ये उत्तम कामगिरी केली, मात्र त्यावेळी वर्ल्डकपचा खिताब ती जिंकवून देऊ शकली नाही.
शेफालीने तिच्या प्रॅक्टिसबद्दल अनेक खुलासे केले आहेत. टी-20 वर्ल्ड कपनंतर तिने अनेक गोष्टींवर काम केलं. शेफालीच्या सांगण्यानुसार, मी कोचसोबत काम करण्यास सुरुवात केली, कारण मला वनडे टीममध्ये स्थान मिळत नव्हतं. त्यामुळे मी वेगवान बॉल खेळण्यास सुरुवात केली. मी मुलांसोबत प्रॅक्टीस करायते आणि मुलं 135-140 किमी प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करायचे.
क्रिकेटसोबतच शेफालीने फिटनेस आणि डाएटिंगवर भर दिला. तिने वर्ल्डकपच्या पराभवातून सावरण्यासाठी अनेक सेशन केले. मॅचसाठी फीट रहावं लागतं म्हणून तिने तिचे आवडते पदार्थ खाणं सोडून दिलं. शेफालीने सांगितलं की, आता ती पिझ्झा खात नाही, डोरेमॉन पाहत नाही कारण तिचा संपूर्ण फोकस फक्त क्रिकेटवर आहे.
शेफाली वर्माचे रेकॉर्ड्स पाहिले तर वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी तिने 51 टी-20 सामन्यात 1231 रन्स केलेत. शेफालीचा स्ट्राईक रेट 134.53 असून तिने T20 मध्ये 149 फोर आणि 48 सिक्सचा पाऊस पाडला आहे. ती भारतासाठी केवळ टी-20 नाही तर वनडे आणि टेस्ट क्रिकेट देखील खेळली आहे. तिच्या उत्तम खेळाच्या जोरावर लहान वयातच बीसीसीआयने तिच्याकडे अंडर-19 टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीमची कमान सोपवली आणि आता तिने इतिहास रचला आहे.