Shaheen Afridi Bowled Virat Kohli : श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया कप स्पर्धेतील तिसरा सामना खेळवला जात आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ 4 वर्षानंतर वनडे सामन्यात आमने सामने आले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच आता या सामन्यात टीम इंडियाची सुरूवात खराब झाल्याचं पहायला मिळत आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा बॅकबोन विराट कोहली बाद झाल्याने आता टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने दोन्ही वाघांची शिकार केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्माला शाहीनने पहिल्या दोन बॉलवर आऊटस्विंग करत जात्यात घेतलं. त्यानंतर एक इनस्विंग बॉलवर शाहीनने रोहितची विकेट काढली. रोहितला काही कळण्याच्या आत शाहीनने बॅट आणि पॅटच्या मधून दांड्या उडवल्या. तर त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीला सुरूवातीला नसीम शाहने घातक गोलंदाजी केली. मात्र, विराटने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर शाहीनच्या ओव्हरमध्ये विराटच्या स्वत:च्या हाताने विकेट देऊन बसला. शाहीनच्या एका बॉलवर खेळताना विराटच्या बॅटला कट बसला आणि बॉट थेट स्टंप्सवर जाऊन आदळला.


पाहा Video




पाहा Playing XI


भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, इशान किशन (WK), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.


पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (WK), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.