नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषण क्रिकेट जगतात तेव्हा चर्चेचा विषय बनला जेव्हा भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकेचे खेळाडू मास्क लावून मैदानात उतरले.


धवनने दिली प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मास्क लावून खेळल्याने नंतर श्रीलंकेच्या टीमला सोशल मीडियावर चांगलंच टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. पण आता भारतीय क्रिकेट टीमचा ओपनर शिखर धवनने ही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटलं की, यामध्ये कोणतंही दुमत नाही की दिल्लीमध्ये प्रदूषण आहे. परंतु आपण जेव्हा खेळायला येतो तेव्हा तुम्ही खेळलं पाहिजे.


श्रीलंकेच्या खेळाडूंना सुनावलं


धवनने म्हटलं की, आमच्या टीममधील अनेक खेळाडूंनादेखील दिल्लीच्या हवामानाचा अनुभव नाही आहे. पण तरी अशा परिस्थितीत देखील ते खेळत आहेत. श्रीलंकामध्ये कदाचित प्रदूषण कमी असेल. तेथे समुद्र किनारा खूप मोठा आहे. पण जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला तेथील परिस्थितीत खेळलं पाहिजे.


प्रदूषणाचं सांगितलं कारण


धवनने म्हटलं की, मी दिल्लीमध्येचं लहानाचा मोठा झालो. सध्या काही राज्यांमध्ये पीक कापून नंतर ते खत जाळल्यामुळे धूर तयार झाला. इतकं ऊन पण नव्हतं. त्यामुळे त्याचा प्रभाव जास्त दिसत होता. ऊन असतं तर धुक्यांचा परिणाम देखील कमी दिसला असता.