शिखर आणि रोहितने टी-२० मध्ये रचला इतिहास, दोघांच्या नावावर हा रेकॉर्ड
निडास ट्रॉफीमधील काल झालेल्या सामन्यात सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी बांगलादेश विरूद्ध टी-२० च्या इतिहासात भागीदारीचा नवा रेकॉर्ड कायम केलाय.
नवी दिल्ली : निडास ट्रॉफीमधील काल झालेल्या सामन्यात सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी बांगलादेश विरूद्ध टी-२० च्या इतिहासात भागीदारीचा नवा रेकॉर्ड कायम केलाय.
टीम इंडियाची हळुवार सुरू
या सामन्यात टॉस बांगलादेशने जिंकला आणि फलंदाजीसाठी टीम इंडियाला निमंत्रण देण्यात आलं. टीम इंडियाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि शिखर धवनने सुरूवात सुरू केली, पण पहिल्या विकेटसाठी ९.५ ओव्हरमध्ये ७० रन्स केले.
रोहित - शिखरचा रेकॉर्ड
टी-२० च्या इतिहासात रोहित शर्मा आणि शिखर धवन ही जोडी भागीदारीच्या बाबतीत दुस-या नंबरवर पोहोचली आहे. दोघांच्या नावावर ८७६ रन्सच्या भागीदारीचा रेकॉर्ड कायम आहे. याआधी न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिल आणि केन विलियमसनच्या नावावर ८७० रन्सच्या भागीदारीचा रेकॉर्ड आहे. आता टी-२० सलामी जोडीच्या रूपात सर्वात जास्त रन्स करण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नर आणि शेन वॉटसन यांच्या नावावर आहे.
टी-२० मध्ये सर्वात यशस्वी सलामी जोडी
वॉटसन आणि वॉर्नर - ११०८ रन्स
रोहित आणि धवन - ८७६ रन्स
गुप्टिल आणि विलियमसन - ८७० रन्स
किती रन्सची भागीदारी?
या सामन्यात टीम इंडियाकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी ९.५ ओव्हरमध्ये ७० रन्सची भागीदारी केली. याआधी सात वेळा अशा संधी आल्या की, टीम इंडियाची सलामी जोडी १०व्या ओव्हरपर्यंत विकेटवर टिकून राहिली. या सामन्यात १० ओव्हरला १ बॉल कमी इथपर्यंत सलामी जोडी टिकून राहिली.