Syed Mushtaq Ali Trophy : सध्या भारतीय संघाचे काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) खेळत आहे. यात शिवम दुबे, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे. मंगळवारी 3 डिसेंबर रोजी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरु असलेल्या मुंबई विरुद्ध सर्व्हिसेज सामन्यात शिवम दुबेने (Shivam Dube) दमदार वादळी खेळी करून तब्बल 72 धावा केल्या यासह त्याने दरम्यान 7 षटकार देखील ठोकले. 


कमबॅक सामन्यात दमदार खेळी : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑलराऊंडर खेळाडू शिवम दुबेसाठी हा कमबॅक सामना होता. तो दुलीप ट्रॉफी दरम्यानच्या एका सामन्यात दुखापतग्रस्त झाला. त्यामुळेच तो बांगलादेश आणि साऊथ आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी 20 सीरिजमध्येही सहभागी होऊ शकला नाही. मात्र तो फिट होऊन पुन्हा मुंबई संघाकडून सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी उतरला. मैदानात परतताच त्याने दमदार फलंदाजी केली. 


एका इनिंगमध्ये तब्बल 7 षटकार : 


शिवम दुबे याने 36 बॉलमध्ये 2 चौकार आणि 7 षटकार ठोकून 71 धावांची खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट या सामन्यात 200 च्या जवळपास होता. तर दुबे सह सूर्यकुमार यादवने देखील 47 बॉलमध्ये 70 धावा केल्या. दरम्यान त्याने 7 चौकार आणि 4 षटकार ठोकले. तर मुंबई संघासाठी अजिंक्य रहाणेने 22 धावा, श्रेयस अय्यरने 20 धावा केल्या. मुंबईच्या संघाने या सामन्यात 4 विकेट्स गमावून 192 धावा केल्या. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये सर्व्हिसेजच्या गोलंदाजांना शिकावं आणि सूर्याच्या जोडीने घाम फोडला आणि दमदार फलंदाजी केली. 


पाहा व्हिडीओ : 



CSK ने शिवमला केलं रिटेन : 


स्टार ऑल राउंडर शिवम दुबे हा मागील काही वर्षांपासून आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळतो. सीएसकेने यंदा देखील आयपीएल 2025 साठी त्याला रिटेन केले. शिवम दुबे सह, ऋतुराज गायकवाड, एम एस धोनी, रवींद्र जडेजा आणि पथीराणा या 5 खेळाडूंना चेन्नईने रिटेन केले. तर ऑक्शनमध्ये चेन्नईने 20 खेळाडूंना खरेदी करून आपल्या संघाशी जोडले. शिवम दुबेला चेन्नई सुपरकिंग्सने 12 कोटींना रिटेन केलं आहे.