Harbhajan Singh: भारत पाकिस्तान (IND vs PAK) सामना म्हटलं तर भांडणं तर आलीच. टीम इंडियाचा माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंह (Harbhajan Singh) आणि शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांच्यातील मैदानावरील वाद आपण सर्वांनी पाहिलाच आहे. क्रिकेटच्या मैदानावर कितीही वाद असला तरी मैदानाबाहेर दोघं चांगले मित्र असल्याचं दिसून येतं. पाकिस्तानसोबत पंगा घेणाऱ्या याच हरभजन सिंह याचा आज वाढदिवस (Harbhajan Singh Birthday) आहे. हरभजन सिंह याचा आज 43 वा वाढदिवस आहे. अशातच शोएब अख्तरने एका मुलाखतीत हरभजन सिंह यांच्याविषयीचा एक किस्सा सांगितला.


काय म्हणाला शोएब अख्तर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकदा सामना झाल्यावर मी हरभजन सिंगसोबत भांडण्यासाठी त्याच्या हॉटेलच्या खोलीत पोहोचलो होतो. भज्जी आमच्याबरोबर खातो, आमच्याबरोबर लाहोरमध्ये फिरतो, तो आमचा पंजाबी भाऊ आहे आणि तरीही तो आमच्याशी गैरवर्तन करेल? असा मला प्रश्न पडला. मला वाटलं की हॉटेलच्या खोलीत जाऊन त्याच्याशी भांडावं. हरभजन सिंगला माहीत होतं की शोएब येणार आहे, पण मला तो सापडला नाही. दुसऱ्या दिवशी मी शांत झालो आणि त्याने माफीही मागितली, असं शोएब अख्तरने म्हटलं होतं. शोएब अख्तरने हा किस्सा 2010 च्या भारत पाकिस्तान सामन्यावेळीचा सांगितला आहे.


नेमकं काय झालं होतं?


आशिया कपच्या सामन्यात भारत पाकिस्तान आमने सामने आले होते. तेव्हा 2008 नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात फक्त आयसीसीच्या स्पर्धामध्येच सामने होत होते. त्यावेळी भारत पाकिस्तान म्हटल्यावर सामने हायव्होल्टेज सामना होणारच. भारताला सामना जिंकण्यासाठी 7 बॉलवर 7 धावांची गरज होती. त्यावेळी मैदानात बॅटिंग करत होता हरभजन सिंह. फुल भायांचा शर्ट आणि त्याला गुंडाळलेले हॅडपॅड्स असं भज्जीचं चित्र सर्वांच्या नजरेत भरलं होतं. भज्जीसमोर उठा ठाकला होता शोएब अख्तर. 19 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर भज्जी आणि अख्तर यांच्यात वादावादी झाली. अख्तरने हरभजनला खुन्नस दिली आणि भज्जी देखील भडकला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला तुम्ही पाहिला असेल. 


आणखी वाचा - Jonny Bairstow : कांगारूंकडून रडीचा डाव? बेअरस्टो Out की Not Out? Video पाहून तुम्हीच सांगा!


दरम्यान, मोहम्मद अमीरच्या खांद्यावर शेवटची ओव्हर टाकण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी हरभजन सिंहने खणखणीत सिक्स खेचला आणि सर्वांची मन जिंकली. त्यावेळी हरभजन सिंहने अख्तरसमोर आक्रमक अंदाजात जल्लोष केला. त्यावर अख्तर नाराज झाला. सामना झाल्यानंतर देखील त्याच्या डोक्यात राग होता. त्यानंतर तो थेट भांडण्यासाठी ड्रेसिंग रूम गाठलं होतं.