`या` कारणामुळे रोहित शर्मा होऊ शकणार नाही टीम इंडियाचा कर्णधार, मोठ कारण समोर
तसे पाहाता विराटनंतर आता रोहितचा मार्ग मोकळा झाला आहे, पण...
मुंबई : विराट कोहलीने टी -20 कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधार पदी कोण येणार यासाठी सर्वत्र चर्चा सुरू आहे. यासाठी काही खेळाडूंची नावं समोर आली आहेत, त्यात रोहित शर्माचे नाव सर्वात आघाडीवर आहे. तसे पाहाता विराटनंतर आता रोहितचा मार्ग मोकळा झाला आहे, परंतु आता असे एक कारण समोर आलं आहे, ज्यामुळ हिटमन आणि त्याचे चाहते लवकरच निराश होऊ शकतात. कारण रोहित शर्माला भारताचे एकदिवसीय कर्णधारपद मिळणे शक्य दिसत नाही.
रोहित शर्माला टी -20 चे कर्णधारपद मिळण्याचा मार्ग मोकळा आहे, पण त्याचे वय लक्षात घेता भारताचे एकदिवसीय कर्णधारपद मिळवणे त्याच्यासाठी कठीण आहे. रोहित शर्मा सध्या 34 वर्षांचा आहे. त्यामुळे त्याला कर्णधार म्हणून संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहेत.
जोपर्यंत विराट कोहलीचा प्रश्न आहे, तो 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपपर्यंत एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपदी राहू शकतो. 2023 चा एकदिवसीय विश्वचषक भारतातच खेळला जाईल, जे जिंकण्यासाठी विराट कोहली सर्वोत्तम प्रयत्न करेल.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा क्रमांक येईपर्यंत तो 36 वर्षांचा झालेला असेल. अशा परिस्थितीत रोहित शर्माला वयाच्या 36 व्या वर्षी वनडे कर्णधारपद देणे बीसीसीआयला शक्य नाही. रोहित शर्मा टी -20 कर्णधार बनू शकतो, पण त्याच्यासाठी एकदिवसीय कर्णधार होणे कठीण आहे. रोहित शर्माचे टी -20 कर्णधारपद देखील चार वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही, कारण तोपर्यंत तो 38 वर्षांचा झालेला असेल.
बीसीसीआयने ऋषभ पंत आणि केएल राहुल यांच्याकडे लक्ष केंद्रित केलं आहे.
विराट कोहलीला वयाच्या 27 व्या वर्षी कसोटीचे कर्णधारपद मिळाले, तर त्याला वयाच्या 29 व्या वर्षी वनडे आणि टी -20 ची कमान मिळाली. विराट कोहलीला त्याच्या कर्णधारपदाचा आनंद घेण्यासाठी भरपूर वेळ मिळाला आहे. कदाचित रोहितला तेवढा वेळ मिळणार नाही. अशा स्थितीत ऋषभ पंत आणि केएल राहुल यांना नवीन कर्णधार म्हणून तयार करणे हे बीसीसीआयचे लक्ष्य असेल.
जर भारताला नवीन कर्णधार बनवायचा असेल, तर केएल राहुल हा एक चांगला पर्याय आहे. त्याने चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडमध्येही त्याची फलंदाजी खूप चांगली होती. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आयपीएलमध्ये तसेच 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे.