Team India: यंदाच्या टी-20 वर्ल्डकपवर टीम इंडियाने नाव कोरलं. वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्म, विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी टी-20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या टूर्नामेंटनंतर टीम इंडिया झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेली आहे. यावेळी पहिला सामना टीम इंडियाला गमवावा लागला, तर दुसऱ्या सामन्यात भारताने 100 रन्सने विजय मिळवला. आता या दोन सामन्यांनंतर शुभमन गिलच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झिम्बाब्वे विरूद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र या सामन्यात फलंदाजांच्या कामगिरीने निराशा झाली. टीमला केवळ 116 रन्सचं लक्ष्यही गाठता आलं नाही. अशा परिस्थितीत दुसऱ्याच दिवशी टीम इंडिया दुसऱ्या सामन्यासाठी आली तेव्हा कर्णधार शुभमन गिलने काही मोठे बदल केले. गिलने यावेळीही टॉस जिंकला पण पहिल्या सामन्या उलट त्याने यावेळी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात गिलने गोलंदाजीची निवड केली आणि पाठलाग करताना टीमला अडचणींचा सामना करावा लागला.


यानंतर शुभमनने प्लेईंग 11 मध्ये केलेले बदल लोकांना हैराण करणारे होते. पहिल्या सामन्यानंतर लगेच दुसऱ्या सामन्यात शुभमनने प्लेईंग 11 मध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. यावेळी युवा फलंदाज साई सुदर्शनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू करण्याची संधी देण्यात आली. टीमची फलंदाजी अधिक मजबूत व्हावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं गिलने म्हटलं आहे. त्याऐवजी वेगवान गोलंदाज खलील अहमदला वगळण्यात आले. खलीलला पहिल्या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.


दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा विजय


झिम्बाब्वेविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने 100 रन्सने विजय मिळवला. यावेळी टीममधील फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. भारताने 20 ओव्हर्समध्ये 2 गडी गमवून 234 रन्स केल्या आणि विजयासाठी 235 रन्सचं आव्हान दिलं. मात्र झिम्बाब्वेचा टीम 134 रन्स करू शकला. भारताने या सामन्यात 100 रन्सने विजय मिळवला आणि सिरीजमध्ये 1-1 ने बरोबरी केली आहे. 


भारत (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार