शुभमन गिल याने मोडला सचिनचा 24 वर्ष जुना रेकॉर्ड, रोहित शर्मालाही टाकले मागे
Shubman Gill Century: टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार पद्धतीने क्लीन स्वीप (whitewash) केला. त्याचवेळी शुभमन गिल याने तिसऱ्या वनडे सामन्यात झंझावाती शतक झळकावले. या शतकासह त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मागे टाकले आहे. तर सचिन तेंडुलकर याचाही विक्रम त्याने मोडला आहे.
मुंबई : Shubman Gill Century: टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार पद्धतीने क्लीन स्वीप (whitewash) केला. झिम्बाब्वे मालिकेत भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी जोरदार खेळ केला. त्याचवेळी शुभमन गिल याने तिसऱ्या वनडे सामन्यात झंझावाती शतक झळकावले. या शतकासह त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याला मागे टाकले आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचाही विक्रम त्याने मोडला आहे.
रोहित शर्माला टाकले मागे राहिला
झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलने 97 चेंडूत 130 धावा केल्या, ज्यात 15 चौकार आणि 1 षटकार ठोकला होता. त्याने चौफेर फटकेबाजी केली. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. शतकासह गिलने रोहित शर्माला मागे टाकले. गिलने वयाच्या 22 वर्षे 348 दिवसांत शतक झळकावले. त्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा विक्रम मोडला. त्याने झिम्बाब्वेविरुद्ध 23 वर्षे 28 दिवसात शतक ठोकले.
सचिनचा 24 वर्षे जुना विक्रम मोडला
शुभमन गिल (Shubman Gill) याने शतक झळकावताच सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा विक्रम मोडला. गिलच्या नावावर आता झिम्बाब्वे विरुद्ध झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडेत एका फलंदाजाने सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. त्याच्या आधी हा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावावर होता. त्याने 1998 मध्ये 127 धावा केल्या होत्या. पण आता शुभमन गिल याने 24 वर्षांनंतर हा विक्रम मोडला आणि 130 धावांची दमदार खेळी खेळली.
शुभमन गिल जबरदस्त फॉर्मात
शुभमन गिल (Shubman Gill) चांगलाच फॉर्मात आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावरही त्याने अप्रतिम खेळ दाखवला. जिथे त्याने 205 धावा केल्या. गिलने गेल्या 6 सामन्यात 112.5 च्या सरासरीने 450 धावा केल्या आहेत ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. तो टीम इंडियाचा नियमित सदस्य आहे, परंतु आता त्याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तो टीम इंडियाचा सर्वात महत्वाचा खेळाडू असून तो सामना विजेता आहे. भारतीय संघाला दमदार सुरुवात करण्यासाठी गिल नेहमीच अग्रेसर आहे.