South Africa Squad For World Cup 2023: यंदाचा वर्ल्ड कप (World Cup 2023) हा भारतात खेळवला जाणार आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या महाकुंभाला सुरूवात होईल. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या संघात खेळवला जाणार आहे. अशातच आता बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. तर भारतापाठोपाठ साऊथ अफ्रिकेने देखील त्यांचा संघ जाहीर केलाय. मात्र, संघ जाहीर होताच साऊथ अफ्रिकेला मोठा झटका बसला आहे. कारण, साऊथ अफ्रिकेच्या स्टार फलंदाजाने निवृत्तीची घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी वर्ल्ड कपसाठी (ODI World Cup 2023) साऊथ अफ्रिकन संघाची घोषणा झाली आहे. अशातच आता संघाची घोषणा होताच क्विंटन डी कॉकने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सर्वत्र खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. साऊथ अफ्रिकेचा संघ टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्यामुळे आता यंदाच्या वर्षी तरी साऊथ अफ्रिकेच्या नावावरचा चोकर्स नावाचा डाग पुसला जाणार का? असा सवाल विचारला जात आहे. 


साऊथ अफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी 15 खेळाडूंचा एक मजबूत संघ तयार केला आहे. यामध्ये 8 असे खेळाडू आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत वर्ल्ड कप खेळलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी हे नवं आव्हान असणार आहे. साऊथ अफ्रिकेचा संघ तगडा मानला जातोय. कारण, कागिसो रबाडा याच्यासह अॅनरिक नॉर्टजे आणि लुंगी एनगिडी यांसारखे गोलंदाज विरोधी संघासाठी घातक ठरू शकतात. 



वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:


टेम्बा बावुमा (C), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, सिसांडा मागाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा, तबरेझ, कागिसो रबाडा, रुसी व्हॅन डर डुसेन.


वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ :


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन, सूर्यकुमार यादव.