श्रीलंका क्रिकेटने 31 वर्षीय क्रिकेटर निरोशन डिकवेला याला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून अनिश्चित काळासाठी बॅन केलं आहे. भारताविरुद्ध डेब्यू करणाऱ्या या  खेळाडूवर एंटी डोपिंग नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. लंका प्रीमियर लीग 2024 दरम्यान डिकवेलाने डोप टेस्टसाठी सॅम्पल दिले होते. ज्यात तो फेल ठरला.  डिकवेला लंका प्रीमियर लीगमध्ये गॉल मार्वल्स या टीमचा कर्णधार होता. श्रीलंका क्रिकेटकडून सांगण्यात आले की त्याला तात्काळ सस्पेंड करण्यात आले आहे आणि पुढील नोटीस येईपर्यंत क्रिकेटचा कोणताही फॉरमॅट खेळू शकणार नाही. अशी माहिती मिळतेय की, त्याने बंदी घातलेलं औषध घेतलं होतं, ज्याचा कार्यप्रदर्शन सुधारण्याशी काही संबंध नव्हता.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाने औपचारिक स्टेटमेंट देताना सांगितले की, "डोपिंगविरोधी उल्लंघन केल्याप्रकरणी निरोशन डिकवेलाला निलंबित करण्यात आले आहे. तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळू शकणार नाही. त्यांचे निलंबन तात्काळ लागू झाले असून पुढील सूचना मिळेपर्यंत ते कायम राहील. लंका प्रीमियर लीगदरम्यान श्रीलंका अँटी डोपिंग एजन्सीने त्याची चाचणी केली होती".


हेही वाचा Vinesh Phogat : भारतात परतताच विनेश फोगटला अश्रू अनावर, साक्षी आणि बजरंगने दिला धीर Video


श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये गॉल मार्वल्सकडून खेळताना निरोशन डिकवेलाने 10 सामन्यात 18.40 च्या सरासरीने 184 धाव केल्या होत्या. 50 धावा हा त्याचा या स्पर्धेतील सर्वाधिक स्कोअर होता. त्याची टीम फायनलपर्यंत पोहोचली होती परंतु जाफना किंग्सकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 



निरोशन डिकवेलाची कारकीर्द :


डिकवेला हा सध्या श्रीलंकेच्या टीमचा भाग नाही. 31 वर्षीय विकेटकिपर फलंदाजाने 2014 मध्ये वनडे आणि 2016 मध्ये टी 20 मध्ये भारता विरुद्ध डेब्यू केले होते. त्याने श्रीलंकेच्या टीमकडून शेवटचा वनडे सामना हा जून 2022 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला तर जून 2021 मध्ये शेवटचा टी 20 सामना हा इंग्लंड विरुद्ध खेळला. डिकवेलाने श्रीलंकेसाठी आतापर्यंत 54 टेस्ट , 55 वनडे आणि 28 टी 20 सामने खेळले आहेत.