मुंबई : ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे आगमन होताच विरोधी संघाकडून वक्तव्य येऊ लागली आहेत. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टिम पेनने भारताचा कर्णधार विराट कोहलीविषयी अजब वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला की तो, 'कोहलीला फक्त एक खेळाडू म्हणून ओळखतो. जगातील इतर क्रिकेटपटूप्रमाणे कोहलीही त्यापैकी एक आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणाला की, तो आणि कोहली फक्त नाणेफेक दरम्यान भेटतात. मैदानावर फारशी चर्चा होत नाही. तो म्हणाला, "मला विराट कोहलीबद्दल बरेच प्रश्न विचारले जातात, बाकीचे खेळाडू आहेत तसेच तो आहे. मला त्या गोष्टींचा फरक नाही पडत. प्रामाणिकपणे सांगतो, माझा त्याच्याशी कोणताच संबंध नाही. फक्त टॉसच्या वेळी त्याला भेटतो आणि त्याच्याविरुद्ध मैदानावर खेळतो, त्याखेरीज आणखी काही नाही."


भारतीय कर्णधार विराट कोहलीचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. त्याचा खेळ पासून अनेक दिग्गज क्रिकेटर त्याचं कौतूक करतात. ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारानेही कोहलीचे कौतुक केले पण त्याचा धावा करणे आवडत नसल्याचं देखील म्हटलं. पेन म्हणतो की, "विराटची ही एक अद्भुत गोष्ट आहे की आम्हाला त्याचा तिरस्कार करणे आवडते पण क्रिकेट चाहते म्हणून त्याची फलंदाजी पाहणे आवडते. पण आता त्याने रन करावे हे आम्ही पाहू इच्छित नाही."



"भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा आहे आणि तो खरोखरच एक स्पर्धा करणारा व्यक्ती आहे. बर्‍याचदा असे प्रसंग आले जेव्हा आम्ही बोललो. पण कर्णधार होतो म्हणून नाही. असं कोणासोबत पण होऊ शकतं.'