Sunil Gavaskar predicts playing 11 : इंग्लंडच्या 'द ओव्हल' मैदानावर 7 जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC 2023 Final) अंतिम सामना रंगणार आहे. याच मानाच्या सामन्यासाठी बीसीसीआयने (BCCI) 15 जणांचा संघ घोषित केला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया खेळणार आहे, तर पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) ऑस्ट्रेलिया संघाची जबाबदारी असणार आहे. टीम इंडियाचा कुल खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याची संघात घरवापसी झालीये. त्यामुळे आता प्लेइंग इलेव्हन कसा असेल? यावर अनेक चर्चा रंगल्याचं दिसतंय. अशातच आता लिटिल मास्टर सुनिल गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी टीम इंडियाला मोलाचा सल्ला देत आपला संघ जाहीर केला. 


काय म्हणाले Sunil Gavaskar ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाला फक्त श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) जागी बदली खेळाडूची गरज होती. त्यामुळे अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) अंतिम संघात स्थान मिळालं, आयपीएलमधील (IPL 2023) त्याच्या सध्याच्या फॉर्ममुळे त्याला संधी मिळाली आहे. रणजी ट्रॉफीमध्ये तो उत्तम खेळला, मुंबईसाठी देखील त्याने शानदार खेळ दाखवला, असं म्हणत गावस्कर यांनी (Sunil Gavaskar On Ajinkya Rahane) अजिंक्य रहाणेचं कौतूक केलंय.


आता प्रश्न असा आहे की फायनल प्लेइंग 11 मध्ये कोणाला संधी मिळणार? केएल राहुल विकेटकीपर म्हणून राहणार की केएस भरत? आम्हाला प्रतीक्षा करावी लागेल आणि पहावं लागेल, असंही गावस्कर(Sunil Gavaskar) म्हणतात. त्यावेळी त्यांना तुमची संभाव्य संघ कसा असेल असा सवाल विचारला गेला, त्यावेळी त्यांनी टीम इंडियाला सल्ले देत आपली टीम सांगितली.


WTC Final 2023: ना विराट ना रहाणे, टीम इंडियाला 'हे' 5 खेळाडू जिंकून देणार वर्ल्ड कप!


माझ्या संघात रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला असतील. चेतेश्वर पुजारा नंबर 3 वर खेळेल, विराट कोहली नेहमीप्रमाणे नंबर 4 वर, तर अजिंक्य रहाणे नंबर 5 वर संधी देण्यात यावी. केएल राहुल नंबर 6 देखील विकेटकीपिंग करताना दिसायला हवा. त्यानंतर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनची जोडी संघात असेल. त्यानंतर फास्ट बॉलर्सच्या बाबतीत जयदेव उनाडकट, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना संधी दिली जावी, असं म्हणत त्यांनी संघ निवडला आहे.


WTC साठी लिटिल मास्टर यांची Playing XI 


रोहित शर्मा, शुभमन गिल,चेतेश्वर पुजारा, विराट कोहली,अजिंक्य रहाणे,केएल राहुल,रवींद्र जडेजा,रविचंद्रन अश्विन,जयदेव उनाडकट,मोहम्मद शमी,मोहम्मद सिराज.


WTC Final साठी भारतीय संघ


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव यादव.


WTC Final साठी ऑस्ट्रेलियाचा संघ


पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर.