WTC Final 2023: ना विराट ना रहाणे, टीम इंडियाला 'हे' 5 खेळाडू जिंकून देणार वर्ल्ड कप!

मानाचा असा जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान लंडनच्या 'द ओव्हल' मैदानावर खेळला जाणार आहे. इंग्लंड येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यात खेळला जाईल. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे.

Apr 25, 2023, 16:53 PM IST

WTC final India vs Australia : मानाचा असा जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील अंतिम सामना 7 ते 11 जून 2023 दरम्यान लंडनच्या 'द ओव्हल' मैदानावर खेळला जाणार आहे. इंग्लंड येथे ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यात खेळला जाईल. अशातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयनं भारतीय संघाची घोषणा केली आहे.

1/5

WTC साठी टीम इंडियाची घोषणा रोहित शर्मा (C), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी,मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

2/5

त्यामुळे या मैदानावर भारतीय फिरकीपटूंची जादू पहायला मिळू शकते. यामध्ये रविचंद्रन अश्विन याचं नाव घ्यावंच लागेल. अश्विनचा अनुभव पाहता, त्याच्यासाठी हा सामना आव्हानात्मक नसेल. त्यामुळे आश्विन गेम चेंजर ठरू शकतो.

3/5

ओव्हल मैदानावर रविंद्र जडेजाचा रेकॉर्ड कमालीचा राहिला आहे. याच मैदानावर इंग्लंडविरुद्ध त्याने संयमी अर्धशतकीय खेळी केली होती. तर जो रुट आणि बेअरस्टो सारख्या खेळाडूंना फिरकीच्या तालावर नाचवलं होतं.

4/5

अक्षर पटेलची भारतीय मैदानाचा पराक्रम सर्वांनी पाहिला आहे. परदेशात त्याने अधिकचे सामने खेळले नाहीत. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे. त्याच्या अष्टपैलू खेळीचा फायदा होण्याची शक्यता आहे.

5/5

टीम इंडियाने टीममध्ये शार्दुल ठाकूरची निवड केली आहे. त्यामुळे अनेकांनी भूवया वर केल्या होत्या. मात्र, शार्दुल 8 सामने खेळले असले तरी त्याच्या नावावर 27 विकेट्स आहेत. इंग्लंडच्या स्विंग खेळपट्टीवर शार्दुल ऑस्ट्रेलियाला पाणी पाजू शकतो.