Suryakumar Yadav Century: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्याच खेळल्या जात असलेल्या टी-ट्वेंटी (IND vs SL 3rd T20I) मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये खेळवला जात आहे. सिरीज जिंकण्यासाठी दोन्ही संघासाठी हा सामना करो या मरो असणार आहे. अशातच आता तिसऱ्या सामन्यात सुर्यकुमार यादवचं वादळी शतक पहायला मिळालं. सूर्याने श्रीलंकेच्या खेळाडूंना सळो की पळो करून सोडलंय. (Suryakumar Yadav Century in IND vs SL 3rd T20I marathi sports news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची (Team India) सुरवात खराब झाली. ईशान किशन लवकर बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या राहुल त्रिपाठीने आपल्या बॅटिंगची चमक दाखवली. त्याने फक्त 16 बॉलमध्ये 35 धावा चोपल्या. तर शुभमन गिलने देखील मोलाची साथ दिली. त्रिपाठी आऊट झाल्यावर सुर्यकुमार मैदानात आला. सूर्याने सुत्र हातात घेतली आणि मैदानात षटकारांचा पावसाळा सुरू झाला. सूर्याने सुरूवातीपासून फटकेबाजी सुरू केली आणि आपलं शतक पुर्ण केलं.



आणखी वाचा - IND vs SL : श्रीलंकेविरूद्धच्या सामन्याआधी भारताच्या 'काश्मिर एक्सप्रेस'ला पाकिस्तानच्या खेळाडूचा खास सल्ला!


फक्त 45 चेंडूत सूर्याने आपलं शतक (Suryakumar Yadav 3rd Century) पुर्ण केलं. 19 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेत सूर्याने टी-ट्वेंटीमधील आपलं तिसरं शतक साजरं केलं. यामध्ये त्याने 8 सिक्स आणि 6 फोर खेचले. 219 च्या स्टाईक रेटने सूर्याने धुमधडाका केलाय. 



दरम्यान, सूर्याला पाहून शुभमन गिलने (Shubman Gill) घेअर बदलले. सुरूवातील हळू सुरूवात करणाऱ्या गिलने 3 षटकार खेचत सुर्यकुमारला (Suryakumar Yadav) मोलाची साथ दिली. भारताने पहिल्या डावात 228 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता मालिका जिंकण्यासाठी श्रीलंकेला 229 धावा कराव्या लागतील. 112 धावा करत सूर्या अखेरपर्यंत नॉट आऊट राहिला.