IND vs SL 3rd T20 : भारताचा युवा गोलंदाज काश्मीर एक्सप्रेस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरान मलिकने श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. खास करून उमरानने सलग दोन विकेट्स घेतल्या त्यावेळी दुसरी विकेट ही फीरकीपटू वानिंदू हसरंगाला क्लीन बोल्ड आऊट केलेली खास होती. उमरानने दुसऱ्या सामन्यात एकूण 3 बळी घेत सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवून घेतली. मात्र त्याला खूप धावा निघाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी खेळाडू सलमान बटने (Salman Butt) एक खास सल्ला दिला आहे. (IND vs SL 3rd T 20 2023 Salman Butts special advice to Umran Malik before the match against Sri Lanka)
तुम्हाला मॅच खेळूनच अनुभव येतो मात्र जर तुमच्याकडे अनुभवाची कमी असेल तर जास्त धावा जावू शकतात. उमरानचा वेग आणि अॅक्शन चांगली आहे. मात्र समोरचा बॅट्समन अनुभवी होता त्याने उमरानच्याच गतीचा फायदा घेत धावा काढल्या. कारण उमरानने बॉलिंगमध्ये यॉर्कर ना स्लोअर बॉलचा वापर केला नाही, असं सलमान बट म्हणाला.
उमरानला अनुभव येण्यासाठी त्याला जास्तीत जास्त संधी देणं गरजेचं आहे. एकदा सामन्याची परिस्थिती पाहून समोरचा फलंदाज कसा खेळतो याचा अभ्यास करून त्याने बॉलिंग केली तर तो तुम्हाला सामने जिंकून देऊ शकतो. उमरानने दुसऱ्या सामन्यात ऑफस्टंम्पवर यॉर्कर टाकू शकत होता पण त्याने तसं केलं नाही त्यामुळे जास्त धावा गेल्याचं बटने म्हटलं आहे.
दरम्यान, आज दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' अशी परिस्थिती असून इतकंच नाहीतर हार्दिक पंड्यालाही एक मोठं आव्हान आहे. हार्दिक पंड्या अँड कंपनीला फक्त सामनाच नाहीतर भारतीय संघाचा हा विजयरथ कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे. मालिकेतील दोन्ही सामने अटीतटीचे झालेले पाहायला मिळाले आहेत. पहिला सामनाही अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता, अक्षर पटेलने शेवटचं षटक टाकत संघाला विजय मिळवून दिला होता.