Suryakumar Yadav, ICC: भारताचा (Team India) माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह नंतर भारताला मिडल ऑर्डर खेळाडू (Middle order player) मिळाला नाही. त्यानंतर आता सूर्यकुमार यादवच्या (Surya kumar Yadav) रुपात आता धडाकेबाज मिडल ऑर्डर खेळाडू मिळाला आहे. भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ 3rd T20I) यांच्यात तिसरा टी-ट्वेंटी सामना आज खेळवला जाणार आहे. या सामन्यात रांगड्या सूर्याकडे नामी संधी आहे. (Suryakumar Yadav may break record of Dawid Malan highest rating of all time for Men's T20I batters sports news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात सूर्यकुमारने 47 धावांची जलद खेळी केल्यानंतर त्याने 910 गुणांचं रेटिंग गाठलं. आपल्या रोमांचकारी फलंदाजाने टी-ट्वेंटी क्रमवारीत (ICC Men's T20I Batting Rankings) अव्वल स्थानावर आपली आघाडी कायम राखली आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सध्या टी-20 मध्ये नंबर-1 फलंदाज आहे. तर दुसऱ्या स्थानी 836 रेटिंग गुणांसह रिझवान (Mohammad Rizwan) कायम आहे. अशातच आता सूर्याकडे एक मोठी संधी चालून आली आहे.


सूर्याकडे नामी संधी -


पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकत सूर्यकुमार नंबर वनचा फलंदाज बनला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. इंग्लंडच्या डेव्हिड मलानने (Dawid Malan) टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 915 पॉईंट कमावले आहेत. त्यानंतर कोणत्याही खेळाडूला हा रेकॉर्ड (highest rating of all time for Men's T20I batters) मोडता आला नाही. त्यानंतर आता सूर्याला हा रेकॉर्ड मोडण्याची संधी मिळाली आहे.


आणखी वाचा - IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू टीमबाहेर!


दरम्यान, अहमदाबाद येथे बुधवारी होणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात त्याला आपल्या विक्रमात सुधारणा करण्याची संधी असेल. गेल्या वर्षीच्या ICC T20 World Cup स्पर्धेत सहा सामन्यांत एकूण 239 धावा करत त्याने सध्याच्या फलंदाजांसाठी अव्वल रँकिंगचा दावा केला होता आणि गेल्या महिन्यातच त्याला आयसीसी टी-ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर (ICC Men's T20I Cricketer of the Year) म्हणून निवडण्यात आलं होतं.