Suryakumar yadav On Test Cricket : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने निवृत्ती जाहीर केली अन् भारतासमोर नवं आव्हान निर्माण झालं. बीसीसीआयने सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर टी-ट्वेंटी संघाची जबाबदारी दिली आणि सूर्याने देखील श्रीलंकेविरुद्ध आपली कॅप्टन्सीची झलक दाखवली. एकीकडे टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट अशी ओळख सूर्याची निर्माण झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने टेस्ट टीममध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता बांगलादेशविरुद्ध सूर्यकुमारला संधी मिळणार का? असा सवाल विचारला जातोय. 


काय म्हणाला सूर्यकुमार यादव?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेड बॉल क्रिकेटला नेहमी माझं प्राधान्य राहिलं आहे. जेव्हा मी मुंबईच्या मैदानवर लहानाचा मोठा झालो आणि अनेक स्थानिक क्रिकेट खेळलो. मी 10 वर्षांहून अधिक काळ अनेक प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये भाग घेतला आहे आणि मला अजूनही या फॉरमॅटमध्ये खेळण्याचा आनंद मिळतो. म्हणून मी दुलीप करंडक स्पर्धेपूर्वी बुची बाबू स्पर्धा खेळायला आलोय, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. 


मी नेहमीच मुंबईसाठी खेळण्याची संधी शोधत असतो, मग ती फर्स्ट क्लास असो किंवा बुची बाबूसारखी स्पर्धा असो. मी भारतासाठी कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं. पण नंतर मी जखमी झालो. अनेकांनी आपलं स्थान निर्माण करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि पण मलाही ते स्थान पुन्हा मिळवायचं आहे, असं वक्तव्य सूर्यकुमार यादव याने केलं आहे. 


मला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवायचं आहे. ज्या खेळाडूंना संधी मिळाली त्यांनी चांगली कामगिरी केली आहे, ते सध्या संधीचे पात्र आहेत, असं मी निश्चित म्हणेल. मी डोमेस्टिक्स खेळेन आणि बघू काय होते. मला रेड बॉल क्रिकेट खेळायला आवडतं आणि भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळू इच्छितो, असं सूर्यकुमार यादव याने स्पष्टपणे म्हटलं आहे.


 दरम्यान, सूर्यकुमार यादव फेब्रुवारी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात शेवटची कसोटी खेळला होता. आता सूर्या 19 महिन्यांनंतर कमबॅक करणार का? असा सवाल विचारला जात आहे.  सूर्यकुमार यादवचं हे वक्तव्य बांगलादेश दौरा सुरू होण्यापूर्वी आलं आहे. बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सिरीजआधी संघाची घोषणा कधी होणार? असा सवाल विचारला जात आहे. 


बांगलादेशविरुद्ध भारताचा संभाव्य स्कॉड


रोहित शर्मा (C), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान (WK), ऋषभ पंत (WK), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.