West Indies vs India T20: आगामी वर्ल्ड कपमध्ये चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार ? यावर चर्चा सुरू असतानाच आता सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने दमदार खेळीचं प्रदर्शन करत बीसीसीआयचे दरवाजे खटखटवले आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज (WI vs IND) यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा (Tilak Verma) यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिलाय. सूर्यकुमार यादवने दमदार खेळी करत 83 धावा केल्या. केवळ 44 बॉलमध्ये सूर्याने मैदान मारलं. या इनिंगमध्ये सूर्याने 10 फोर आणि 4 सिक्स खेचले. त्यामुळे सूर्या अचानक सेहवाग मोडमध्ये कसा काय आला? यावर आता चर्चा होताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी एकमेकांचा इंटरव्ह्यु घेतला. बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावेळी दोघांनी आपापल्या खेळाबद्दल खुलासे केले. तिलक वर्माने सूर्याला महत्त्वाचा प्रश्न विचारला. जेव्हा तू फलंदाजीसाठी उतरला तेव्हा तू आरामात सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता, मग अचानक निर्णय का बदलला? असा सवाल तिलकने केला. त्यावर सूर्याने स्फोटक फलंदाजीचं रहस्य सांगितलं. (Suryakumar Yadav And Tilak Varma Special Chat)


होय, जेव्हा मी फलंदाजीसाठी उतरला तेव्हा मी आरामात सुरुवात करण्याचा निर्णय घेतला होता, पण पहिल्याच चेंडूवर चौकार लागला. त्यावेळी मी आपला निर्णय बदलला आणि वेगवान फलंदाजी सुरू केली, असं सूर्यकुमार यादव म्हणतो. त्याआधी सूर्याने माझे वनडे मधील नंबर खूप खराब आहेत आणि ते मान्य करायला मला लाज वाटत नाही, असं वक्तव्य देखील केलं होतं. त्यामुळे आता त्याला वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) संधी मिळणार का? असा सवाल आता विचारला जात आहे.


पाहा Video



दरम्यान, वेस्ट इंडिज दौऱ्यावर (WI vs IND) टीम इंडियासाठी T20 मालिकेची सुरुवात चांगली झाली नाही. यजमान संघ वेस्ट इंडिजने पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव केला होता. मात्र, तिसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त पुनरागमन करत मालिकेत लाज राखली आहे. सूर्यासह तिलक वर्माने देखील दमदार फलंदाजी करत 4 थ्या क्रमांकासाठी दावा ठोकलाय. तिलक वर्माने आक्रमक फलंदाजी करत नाबाद 49 धावांची खेळी केली. मात्र, हार्दिकच्या सिक्समुळं त्याला अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे आता हार्दिक पांड्या ट्रोल होताना दिसत आहे.